Breaking | चिंतेत भर! पुढचे 10 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

राज्य सरकारचं केंद्राला पत्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाचा अटकाव करण्यासाठी राज्यात सध्या टीका उत्सव जोरात सुरू आहे. पण, केवळ दहा दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. लसींचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आणखी डोस पुरवावे, अशा मागणीचे पत्र राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवले आहे.

सध्या राज्यात टीका उत्सवात लोकांना लस देण्याची मोहीम नेटाने सुरू आहे. मुळगावात बुधवारी १०८ वर्षांच्या आजीने कोविडची लस घेतली. विशेष म्हणजे तिला आतापर्यंत पाच वेळा ह्रदयविकाराचा झटका येऊन केला आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य आजार असलेल्या बऱ्याच जण पंचायत अथवा इस्पितळांत जाऊन लस घेत आहेत. पण सर्वांत ज्येष्ठ अशा १०८ वर्षांच्या आजीने लस घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

hirabai

हेही वाचा – ५ वेळा हार्टअटॅक आला, लढल्या! आता कोरोनाशी लढण्यासाठीही हिराबाई सज्ज आहेत

राज्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. बुधवारी एका दिवसात १० हजार १०६ जणांनी लस घेतल्याची माहिती, सूत्रांनी दिली. २२ पंचायतींनी मिळून ५ हजार ६३४ जणांनी खासगी तसेच सरकारी इस्पितळात मिळून ४ हजार ४७२ जणांनी लस घेतली आहे. आतापर्यंत एकूण २ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यातील ४० हजार जणांनी लसीचा दुसरा डोसही घेतला आहे.

हेही वाचा – नितेश राणेंनी यासाठी केलं गोव्याच्या ‘सीएम’चं कौतुक!

रुग्णवाढीची चिंता कायम

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा 450च्या पार गेलाय. बुधवारी दिवसभरात तब्बल 473 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 5 हजार 112च्या पार गेली आहे. बुधवारी राज्यात 473 नवे रुग्ण आढळून आलेत, तर चौघांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील सध्याच्या घडीला एकूण 5 हजार 112 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट आणखी घसरला असून आता तो 90.64 टक्क्यांवर आला आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानंही वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या 7 दिवसांत तब्बल 3588 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढ चिंताजनक मानली जाते आहे. तर 7 दिवसांत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर गोव्यात पर्वरीत 484, तर दक्षिण गोव्यात मडगावमध्ये 591 सक्रिय रुग्ण आहेत. फोंडा आणि पणजीतील सक्रिय रुग्णसंख्याही तीनशेच्या पार गेली आहे. पणजीत 322 सक्रिय रुग्ण आहेत, तर फोंड्यात 387 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कुडतरी, वास्को, कांदोळी आणि म्हापशातील रुग्णवाढही चिंतेचा विषय ठरु लागली आहे.

हेही वाचा – Lockdownबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं मोठं विधान! म्हणाले…

तर लसीकरणं बंद करणार?

निवडणुका होत असलेल्या पाच पालिका क्षेत्रांत २१ एप्रिलच्या सायंकाळी ५ पर्यंत ‘टीका उत्सव’ आयोजित करण्यास राज्य निवडणूक आयागाने मान्यता दिली आहे. पण या उत्सवाचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर न करण्याचा इशारा आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांना दिला आहे.

राज्यातील म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच पालिकांसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २६ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकानिमित्त या पाचही पालिका क्षेत्रांत अाचारसंहिता लागू आहे. करोना लसीकरण महत्त्वाचे असल्याने आयोगाने तेथे ‘टीका उत्सव’ आयोजनास परवानगी दिली आहे. पण राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोणतीही राजकीय जाहिरातबाजी न करण्याचा, तसेच आचारसंहितेचा भंग झाल्यास लसीकरण थांबवण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी तसेच निवडणूक अधिकाऱ्यांना यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही आयोगाने केल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!