खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांचे शुल्क निश्चित

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
पणजी : खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारांचे दर निश्चित करण्यात आलेत. सामान्य वॉर्डमध्ये कोविड उपचारांसाठी प्रतिदिनी 8 हजार रुपये दर निश्चित करण्यात आलाय.
एका रुममध्ये दोन रुग्णासांठी 10 हजार 400 रुपये उपचार दर आहे. खासगी रुमचा दर 12 हजार 800 रुपये करण्यात आलाय. आयसीयूत व्हेंटीलेटरसह उपचार दर 19 हजार 200 रुपये एवढा ठेवण्यात आलाय. पूर्वीचे दर आणि आता नव्याने ठरविण्यात आलेले दर खालिलप्रमाणे.

कोविड उपचार शुल्क
सर्वसामान्य वॉर्ड : पूर्वीचं शुल्क 10 हजार (दर दिवशी) आताच नवं शुल्क 8 हजार
एका रुममध्ये दोन रुग्ण : पूर्वीचं शुल्क 13 हजार (दर दिवशी) आताच नवं शुल्क10 हजार 400 रुपये (दर दिवशी)
खासगी रुम : पूर्वीचं शुल्क 16 हजार (दर दिवशी) आताच नवं शुल्क 12 हजार 800 रुपये (दर दिवशी)
आयसीयू व्हेंटीलेटरसह : पूर्वीचं शुल्क 24 हजार (दर दिवशी) आताच नवं शुल्क 19 हजार 200 रुपये (दर दिवशी)
नव्या शुल्कात खालील बाबींचा समावेश
- प्राथमिक आणि स्पेशालिस्ट सल्लागार शुल्क
- खाट शुल्क
- एक्स रे, ईसीजी, लिव्हर फंक्शनल टेस्ट
आयसीयूत वाढीव ऑक्सिजनचा या नव्या शुल्कात समावेश नाही.