५ दिवसात देशात ११ हजार मृत्यू, काँग्रेसचा मोदी सिस्टमवर वार

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : देशात कोविडमूळे उद्भवलेली परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर स्वरुप प्राप्त करत आहे. गेल्या पाच दिवसांत देशात कोविडमूळे ११ हजार ८०८ लोकांचा मृत्यू झालाय. या एवढ्या मृत्यूंना प्रधानमंत्री मोदींची सिस्टीम जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केलीय.

सोशल मीडिया कॅम्पेनच्या माध्यमातून काँग्रेसचा वार

देशात ११ हजारांपेक्षा जास्त लोकांना मरण आल्याने काँग्रेसने मोदी सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधलाय. या सर्व मृत्यूना मोदींची सिस्टीम जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केलीय. ज्यावेळी प्रधानमंत्री कोरोवार मात केल्याचा विजयोत्सव साजरा करत होते त्यावेळी कोरोना देशात मोठ विध्वंसक रुप घेऊन येत होतं. प्रधानमंत्र्यांच्या हलगर्जीपणाचा देशाला भोवला असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

डबल म्युटेशनसह कोरोनाच्या विविध स्ट्रेनमुळे भारतातील परिस्थिती चिंताजनक बनलीय. देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून रुग्णवाढही वेगाने होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 46 हजार 786 रुग्णांची नोंद झालीय. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक आहे. सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णावाढीबरोबरच देशात मृत्यूचं थैमानही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. देशात 24 तासांत अडीच हजारांहून अधिक रुग्णांनी प्राण गमावले. देशात 48 तासांत 5 हजारहून अधिक रुग्ण दगावल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक आणि मंत्र्यांची पार्टी- गिरीश चोडणकर

राज्यात कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असताना सरकाचे मंत्री पार्ट्या करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी केलाय. छत्तीसगडमध्ये सर्व सोयिसुविधांनी युक्त ७ दिवसात स्टेडीयमचं रुपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आलाय. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेलांकडून शिकण्याची गरज असल्याचा सल्ला चोडणकरांनी दिलाय.

दिगंबर कामतांचं फेसबुक लाईव्ह

गोव्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत रविवारी संध्याकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत. शनिवारी आपल्या वाढदीवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना संबोधीत केलं होतं. आता दिगंबर कामत रविवारी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!