श्रीदत्त पद्मनाभ पीठावर कोविड-१९ लसीकरण

वैदिक गुरुकुलातील शिष्यांना मिळाली कोविड प्रतिबंधक लस

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुंडई: विश्वभर कोविड -१९ महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी आणि डॉक्टरांनी निर्माण केलेली लस आज भारतच नव्हे, तर विश्व पटलावर लसीकरणास वापरली जात आहे.

हेही वाचाः ‘डिजिटल इंडिया’ साठी ६१ हजार १०९ कोटींचा निधी

वैदिक गुरुकुलातील शिष्यांचं कोविड-१९ लसीकरण

गोवा राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली लसीकरण मोहिमेचा उपक्रमांतर्गत श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने तथा मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर जी यांच्या सहकार्याने श्रीदत्तपद्मनाभ पीठ संचालित स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुलातील शिष्यांना कोविड-१९ लसीकरण श्री क्षेत्र तपोभूमीवर कुंडई येथे संपन्न झालं.

हेही वाचाः रुग्णवाढ दीडशेच्या आत, २४ तासात ७ रुग्ण दगावले

मडकई आरोग्य केंद्राच्या डॉ. दीपाली नाईक यांच्या उपस्थितीत लसीकरण

आज देशातील प्रत्येक नागरिक कोविड-१९ विरुद्धात लढा देण्यास विविध माध्यमातून पुढे येत आहे. लसीकरण उपक्रमात मडकई आरोग्य केंद्राच्या डॉ. दीपाली नाईक यांच्या उपस्थितीत सर्वांनी पहिला डोस घेतला. डॉक्टर दीपाली नाईक यांनी सर्वाना मार्गदर्शन केलं.

हेही वाचाः सांगे, प्रियोळ मतदारसंघात ‘आप’ला मिळाली गती

याप्रसंगी निलिमा मांद्रेकर, प्रबंधक शुभक्षण नाईक, वेदिक गुरुकुलच्या मँनेजर प्रवीणा नार्वेकर तसंच वेदमूर्ती साईदत्तजी, वेदमूर्ती दत्तराजजी आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!