सावधान! गोव्यात वेगानं पसरतोय कोरोना

सोमवारी आढळले 247 रूग्ण, दोघांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. मागील काही दिवसांपासून दरदिवशी अडिचशेपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत आहेत. सोमवारी 247 नवे रुग्ण सापडले, तर एकाचा मृत्यू झालाय.

राज्यात सध्याच्या घडीला एकूण अ‍ॅक्टिव्ह केसीस 2 हजार 180 आहेत. उत्तर गोव्यात सर्वांत जास्त अ‍ॅक्टिव्ह केसीस पणजीत 212 इतक्या आहेत. दक्षिण गोव्यात सर्वांत जास्त अ‍ॅक्टिव्ह केसीस मडगावमध्ये 236 इतक्या आहेत.

बार्देस तालुक्यात 623, सासष्टीत 474, तिसवाडीत 308, मुरगावात 246, फोंड्यात 208 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

राज्यात निर्बंध कधी?

महाराष्ट्रात कोविडच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा होती. अखेर मिनी लॉकडाऊन महाराष्ट्रात लावण्यात आलंय. महाराष्ट्र प्रशासनाने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येनं राज्यात काय निर्णय सरकार घेतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!