402 पैकी ‘इतक्या’ उमेदवारांवर खटले

5 पालिकांच्या उमेदवारांचं भवितव्य सोमवारी ठरणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच नगरपालिकांच्या 23 एप्रिल रोजी मतदान झालं असून सोमवारी 26 रोजी निकाल होणार आहे. या निवडणुकीसाठी 402 उमेदवारपैकी 31 उमदेवाऱयावर खटले सुरू असल्याची महिती उमेदवारांनी सादर केली आहे. यातील कितीजणांचं भविष्य उजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

402 पैकी 31 उमेदवारांवर खटले

म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे आणि सांगे या पाच नगरपालिकांच्या निवडणूकीत 402 उमेदवार रिंगणात होते. त्यात सर्वाधिक 125 उमदेवार मुरगावात, त्यानंतर मडगावात 98, म्हापशात 81, केपेत 55 तर सांगेत 43 उमेदवार उभे होते. प्रभाग फेररचना व आरक्षणाचा घोळ झाल्यामुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने वरील पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, 23 रोजी मतदान झालं, तर 26 रोजी मतमोजणी होणार आहे. या पाच पालिकांच्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, वय, शिक्षण तसंच व्यवसाय याबाबत मूल्यांकन ‘गोवन वार्ता’तर्फे करण्यात आलं होतं. त्यानुसार, सर्वाधिक खटले असलेले 19 उमेदवार मुरगाव पालिकेत उभे होते. त्यानंतर मडगाव ७, म्हापसाच्या आणि सांगे पालिकेत प्रत्येकी दोन तर केपे पालिकेतील एकावर खटले सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

तरुण आणि वयस्क निवडणुकीच्या रिंगणात

या व्यतिरिक्त पाचही पालिकेपैकी सर्वांत युवा उमेदवार केपे पालिकेत निवडणूक लढवली असून त्याचं वय 21 आहे. तर सर्वाधिक वयस्क 79 वर्षीय उमेदवार म्हापसा आणि मुरगावात निवडणूक लढत आहे.

4 बेरोजगार, तर 2 अशिक्षित

मुरगाव नगरपालिकेच्या 25 प्रभागासाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. यातील चार उमेदवार बेरोजगार आहेत. तर दोन उमेदवार अशिक्षित आहे. निवडणूक लढलेल्या उमेदवारांपैकी 56 जणांनी दहावीपर्यंत, तिघांनी अकरावी, 26 जणांनी बारावीपर्यंत, दोघांनी चौदावी, 22 जणांनी पदवीपर्यंत तर 14 जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.

चौथी ते पदव्युत्तर

म्हापसा नगरपालिकेच्या 20 प्रभागाच्या निवडणुकीसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी 34 जणांनी चौथी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर 13 जणांनी बारावीपर्यंत, एकाने तेरावी, 16 जणांनी पदवी पर्यंत, सहा जणांनी डिप्लोमा पर्यंत तर 11 जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.

२५ प्रभागांसाठी ९८ उमेदवार रिंगणात

मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांसाठी 98 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 48 जणांनी दहावीपर्यंत, 5 अकरावी, 11 जणांनी बारावीपर्यंत, दोघे डिप्लोमा, 28 जणांनी पदवीपर्यंत तर 3 जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. तर एका उमेदवाराने माहिती दिली नाही.

3 बेरोजगार, 1 अशिक्षित, तर 2 विद्यार्थी

केपे नगरपालिकेच्या 13 प्रभागाच्य निवडणुकीसाठी 55 उमेदवार रिंगणात आहेत. यातील तीन उमेदवार बेरोजगार आहेत. एक उमेदवार अशिक्षित आहे. दोघे विद्यार्थीही रिंगणात आहेत. निवडणूकीत उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी 36 जणांनी दहावीपर्यंत, सात जणांनी पदवी, तर तिघांनी पदव्युत्तर पदवी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

10 प्रभागातील 43 उमेदवारांमध्ये लढत

सांगे नगरपालिकांच्या 10 प्रभागाच्या निवडणुकीसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. यातील एक उमेदवार बेरोजगार आहे, तर 10 जण पदवीधर तर एकाने पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!