दांडेलीत 75 लाखाच्या बनावट तर 4.5 लाखाच्या खऱ्या नोटा जप्त

बेळगाव, महाराष्ट्र व दांडेलीत सहा जणांना अटक; दांडेली बनावट नोटांचे बेळगाव-महाराष्ट्र कनेक्शन?

Goan Varta Live | प्रतिनिधी

जोयडा: दांडेली येथील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छाप टाकून दांडेली ग्रामीण पोलिसांनी 75 लाखाच्या बनावट नोटासह सहा जणांना अटक केली.

हेही वाचाः CRIME | खंडणी मागणाऱ्या टोळीविरोधात आरोपपत्र दाखल

6 जणांना अटक

अटक करण्यात आलेल्यामध्ये बेळगाव येथील अमर नाईक, सागर कळणूरकर, महाराष्ट्रात रत्नागिरी येथील किरण देसाई (वय.40), गिरीश पुजारी (वय.42), दांडेली येथील शबीर कुट्टी (वय. 45) शिवाजी कांबळे (वय. 52) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याची मशीन, दोन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसंच 4.5 लाखाच्या खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचाः CRIME | मडगावात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जप्त

बेळगावसह महाराष्ट्रातील बाजारपेठेत बनावट नोटांचा खप

दांडेली येथील शबीर कट्टी आणि शिवाजी कांबळे हे येथे बनावट नोटा तयार करीत होते. त्या नोटा बेळगावसह महाराष्ट्रातील बाजारपेठेत खपवल्या जात होत्या. महाराष्ट्र आणि बेळगावमधील अटक करण्यात आलेले संशयित हे बनावट नोटा नेण्यासाठी दांडेली येथे आले होते. हे प्रकरण दांडेली ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झालं आहे. बनावट नोटांमध्ये दोन हजार, पाचशे आणि दोनशे रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या.

पोलिसांचा तपास सुरू

दांडेली येथे बनावट नोटा घेऊन जाण्याससाठी महाराष्ट्र व बेळगावरून संशयित आले होते. त्यामुळे येथील बाजारात या नोटा चालनात जाण्याचा संशय आहे. गोव्यातही या नोटा चलनात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. हे रॅकेट किती मोठं आहे याचा शोध घेऊन त्याचा फर्दाफाश करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं कारवारचे एसपी शिवप्रकाश म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!