पालिकेला अंधारात ठेवून नगरसेवकांचा दुकानावर कारवाईचा प्रयत्न

नगरसेवक विराज फडके यांची थेट कृती; म्हापशातील राजकारण चर्चेत

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: पालिका निवडणूकीपासून म्हापशात सुडाचं राजकारणाला ऊत आला आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि पालिका अभियंता विभागाला अंधारात ठेवून तसंच कोणत्याही अतिक्रमण हटाव आदेशाशिवाय नगरसेवक विराज फडके यांनी पालिका कामगारांच्या आधारे मगो नेते भारत तोरस्कर यांच्या खोर्ली सीम येथील गाळेवजा दुकानावरील प्लास्टीकच्या छतावर कारवाईचा प्रयत्न केला. पण शुभम तोरस्कर आणि स्थानिकांनी या प्रकारास हरकत घेतल्याने ही बेकायदा कारवाई होऊ शकली नाही. हा राजकीय ड्रामा म्हापशात दिवसभर चर्चेत होता.

हेही वाचाः संशयिताची याचिका मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग

पुता पुत्रांनी भारत तोरस्कर यांना वेगवेगळ्या मार्गे छळण्याचा विडाच उचलला

म्हापसा पालिका निवडणूकीत प्रभाग 16 मधून मगो नेते तथा माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके आणि मगो नेते भारत तोरस्कर यांनी आपल्या विराज फडके आणि शुभम तोरस्कर या पुत्रांना एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरवलं होतं. त्यापासून फडके पुता पुत्रांनी भारत तोरस्कर यांना वेगवेगळ्या मार्गे छळण्याचा विडाच उचलला आहे. नगरसेवक विराज फडके यांना पालिकेच्या बाजार समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर तोरस्कर यांचं बाजारपेठेतील दुकान बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी पालिका कर्मचार्‍यांचा वापर केला जात आहे.

हेही वाचाः वाडी-बाणावली येथील चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक

बुधवारी सकाळी घडला प्रकार

बुधवारी सकाळी पालिकेला अंधारात ठेवून फडके पिता पुत्रांने तोरस्कर यांच्या दुकानावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते प्रत्यक्षरित्या घटनास्थळी उपस्थित होते.
या कारवाई बाबतचे पालिका मुख्याधिकार्‍यांचे आदेशपत्र पालिका कामगारांकडे नव्हते. त्यामुळे भारत तोरस्कर यांचे पुत्र शुभम तोरस्कर यांनी त्यास हरकत घेतली.

हेही वाचाः मोरजीत चरस जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

तरीही सदर दुकानावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रकार एका नगरसेवकाकडूनच घडला

पालिका क्षेत्रातील एकादे अतिक्रमण हटविण्याचा अधिकार कायद्यानुसार नगरसेवकांना नाही. शिवाय घटनास्थळ प्रभाग 18 मध्ये येते. सदर प्रभागाची नगरसेविका अन्वी कोरगांवकर यांनी किंवा इतर नगरसेवकांनी सदर दुकानाविरूद्ध पालिकेकडे तक्रार केलेली नाही. तरीही सदर दुकानावरील अतिक्रमण हटविण्याचा प्रकार एका नगरसेवकाकडूनच घडला.

हेही वाचाः कामुर्लीत ट्रकसह रेती जप्त

या कारवाईचं मुख्याधिकार्‍यांचं आदेशपत्र दाखवण्याची मागणी

या कारवाईचं मुख्याधिकार्‍यांचं आदेशपत्र दाखवण्याची मागणी माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी पालिका कर्मचार्‍यांकडे केली. त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष विनोद फडके यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पण टोपले आणि माजी नगराध्यक्ष आर्मिन ब्रागांझा यांनी कायद्यानुसारच कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली. शेवटी पोलिसांनी यात हस्तक्षेप केला.
दरम्यान पालिका मुख्याधिकारी उल्हास कदम व नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी या प्रकाराबाबतीत बोलणं टाळलं.

हेही वाचाः साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास ठराव

या कारवाई मागे कुठलेच राजकारण किंवा वैयक्तिक वैर नाही

पदपथावर अतिक्रमण केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पालिका कर्मचारी कारवाईस गेले. पण तेथील दुकानदाराने कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली. या घटनेची माहिती मला मार्केट निरीक्षकांनी दिली असता मी तिथे धाव घेतली. मुख्याधिकार्‍यांनी अतिक्रमण हटावबाबत पूर्वीच आदेश दिलेला आहे. या कारवाई मागे कुठलेच राजकारण किंवा वैयक्तिक वैर नाही, असं नगरसेवक विराज फडके यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचाः वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.51 टक्के

हा प्रकार निंदनीय

वार्‍यामुळे पावसाचं पाणी दुकानात घुसतं म्हणून दुकानाला प्लास्टीकचं आवरण घालण्यात आलं होतं. हे अतिक्रमण नव्हे. पोलिकेने कोणतीही नोटीस किंवा आदेश न पाठवता पालिका कर्मचार्‍यांच्या सहाय्याने हा सुडापोटी कारवाईचा प्रयत्न झाला. हा प्रकार निंदनीय आहे, असं शुभम तोरकर यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Video | JIT ON SOPATE | ‘जीत’ का डर कायम रहे. जीत यांचं आमदार सोपटेंना जोरदार प्रत्युत्तर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!