देशात गेल्या 24 तासांत 1 हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू, रुग्णवाढही दोन लाखाच्या जवळ

दुसऱ्या लाटेतली चिंताजनक आकडेवारी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गोवा राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याची आकडेवारी दररोज समोर येते आहे. दरम्यान बुधवारी देशातली जी आकडेवारी समोर आली आहे, ती चिंताजनकच नाही तर घाबरवणारीही आहे. देशात गेल्या 24 तासांत दोन लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून आलेत तर एकूण 1 हजारपेक्षा जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 84 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत तर 1 हजार 27 रुग्ण दगावले आहे. गेल्या 24 तासांत एकूण 82 हजार 339 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 72 हजार 85 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्याच्या एकूण सक्रिय रुग्णांची देशातली आकडेवारी 13 लाख 65 हजार 704वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 11 कोटी 11 लाख 79 हजार 578 रुग्णांचं लसीकरण करण्यात आल्याची आकडेवारी सरकारनं दिली आहे.

महाराष्ट्रातही रुग्णवाढीचा उच्चांक

मंगळवारी दिवसभरात महाराष्ट्र राज्यात तब्बल ६० हजार २१२ कोरोनाबाधित वाढलेत. तर २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात सध्या ५,९३,०४२ रुग्ण उपचार घेत आहेत.

coronavirus-test-1606815937

गोव्यातही विक्रमी रुग्णवाढ

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा पुन्हा एकदा 550च्या पार गेलाय. मंगळवारी दिवसभरात तब्बल 562 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आता 4 हजार 800च्या पार गेली आहे. मंगळवारी राज्यात 562 नवे रुग्ण आढळून आलेत, तर तिघांचा मृत्यू झालाय. राज्यातील सध्याच्या घडीला एकूण 4 हजार 888 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेट आणखी घसरला असून आता तो 90.94 टक्क्यांवर आला आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानंही वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या 7 दिवसांत तब्बल 3502 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही वाढ चिंताजनक मानली जाते आहे. तर 7 दिवसांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर गोव्यात पर्वरीत 460, तर दक्षिण गोव्यात मडगावमध्ये 523 सक्रिय रुग्ण आहेत. फोंडा आणि पणजीतील सक्रिय रुग्णसंख्याही तीनशेच्या पार गेली आहे. पणजीत 340 सक्रिय रुग्ण आहेत, तर फोंड्यात 369 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कुडतरी, वास्को, कांदोळी आणि म्हापशातील रुग्णवाढही चिंतेचा विषय ठरु लागली आहे.

कुठे किती सक्रिय रुग्ण? (उत्तर गोवा)

डिचोली 113
साखळी 107
पेडणे 104
वाळपई 50
म्हापसा 330
पणजी 340
हळदोणा 86
बेतकी 34
कांदोळी 311
कासारवर्णे 12
कोलवाळ 68
खोर्ली 110
चिंबल 177
शिवोली 165
पर्वरी 460
मये 33

कुठे किती सक्रिय रुग्ण? (दक्षिण गोवा)

कुडचडे 63
काणकोण 82
मडगाव 553
वास्को 239
बाळ्ळी 44
कासावली 155
चिंचिणी 92
कुठ्ठाळी 275
कुडतरी 76
लोटली 66
मडकई 31
केपे 34
सांगे 92
शिरोडा 82
धारबांदोडा 60
फोंडा 369
नावेली 87

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!