CORONA VACCINATION | मी घेतली, तुम्ही कधी घेताय?

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी
पणजीः वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आलाय. ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतर सरकारने 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. आता 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरणही सुरू करत असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी गुरुवारी कोरोनावरी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी ही लस साखळी येथील सरकारी रुग्णालयात जाऊन घेतली आहे.

ट्विट करून दिली लस घेतल्याची माहिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी कोविशिल्डची दुसरी लस घेतल्याची माहिती गोंयकारांना ट्विट करून दिली आहे. ट्विट करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, आज कोविशिल्ड लसीचा मी दुसरा डोस घेतला आहे. ही लस मी साखळीतील सामाजिक आरोग्य केंद्रात जाऊन घेतली आहे.
Took my second dose of #COVID19 vaccine today at CHC, Sankhali. Once again I urge all eligible citizens to get vaccinated and strengthen the fight against this pandemic. #GoaFightsCOVID19 pic.twitter.com/5j0RRfFarX
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) April 22, 2021
गोंयकारांना लस घेण्यासाठी केलं आवाहन
मुख्यमंत्री केवळ लस घेतल्याची माहिती ट्विटमध्ये दिलेली नाही. तर त्यांनी गोंयकारांना लस घेण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मुख्यमंत्री म्हणालेत, लस घेण्यास जे पात्र आहेत त्या सर्व गोंयकारांना पुन्हा एकदा मी आवाहन करतो की त्यांना कोविड लस घेतली नसेल तर ती लवकरात लवकर घ्यावी. या कोविड महामारीशी लढायचं असेल तर लस घेऊन स्वतःला त्या लढाईसाठी सक्षण करण्याखेरीज पर्याय नाही. त्यामुळे कृपया लस घ्या म्हणून #GoaFightsCOVID19 असं त्यांनी ट्विट केलंय.
हेही वाचाः BREAKING | केंद्राचा मोठा निर्णय! 1 मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचं कोरोना लसीकरण
3 मार्चला घेतली होती पहिली लस
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी कोरोनावरील त्यांनी पहिली कोविशिल्ड लस 3 मार्चला साखळीतील सामाजिक आरोग्य केंद्रात जाऊन घेतली होती. त्यावेळी सुद्धा त्यांनी गोंयकारांना लसीकरणासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं.