CORONA UPDATE | बुधवारी कोविड बळींची पाटी कोरी

बुधवारी ४७ नव्या रुग्णांची नोंद, कोविडचे सक्रिय रुग्ण ५९७ वर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं रुग्णांच्या आकडेवारीवरुन दिसतंय. तसंच बऱ्याच दिवसांनी शून्य कोविड बळींची नोंद झालीये. मागच्या 5 दिवसांत राज्यात तब्बल 19 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याचं समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी एकही कोविड मृत्यू झाला नसल्याने राज्यभरातून दिलासा व्यक्त करण्यात येतोय.

बुधवारी ४७ नव्या कोविड बाधितांची नोंद

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात बुधवारी ४७ नव्या कोविड बाधितांची नोंद झालीये. त्यामुळे राज्यातील सक्रीय कोविडबाधितांची संख्या ५९७ वर जाऊन पोहोचलीये. नव्या कोविडबाधितांची संख्या सध्या आटोक्यात असल्यानं राज्यातील कोविड परिस्थिती सुधारतेय असं म्हणायला हरकत नाही.

मागच्या २४ तासात ७० रुग्ण झाले बरे

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिनच्या आकडेवारीनुसार बुधवारी ७० जणांनी कोविडवर मात केली आहे. यातील ६ जण पूर्ण बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय. नव्याने समोर आलेल्या ४७ कोविड बाधितांपैकी ६ कोविड बाधित उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून ४१ जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट वाढला

राज्याचा रिकव्हरी रेट मोठ्या प्रमाणात सुधारताना दिसतोय. कोविडवर मात करून बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय. बुधवारी राज्याचा रिकव्हरी रेट ९७.७८ टक्के नोंद झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!