CORONA UPDATE | राज्यात करोनाचे आणखी दोन बळी

११२ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह; ९२८ सक्रिय बाधित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशभरात पुन्हा कोविड डोके वर काढत असतानाच राज्यातही कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोविडने दोघांचे बळी घेतले असून ११२ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. खूप दिवसांनी बळीचा आकडा वाढल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या २४ तासांत ९५० जणांचे नमुने तपासले

गेल्या २४ तासांत ९५० जणांचे नमुने तपासण्यात आले. या काळात ७८ जणांनी कोविडवर मात केली असून रिकव्हरी रेट ९८.०८ टक्के आहे. राज्यात सध्या ९२८ सक्रिय बाधित आहेत. ११२ पैकी एकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून १११ जणांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. दोघा जणांच्या मृत्यूमुळे राज्यातील आतापर्यंतच्या करोना बळींची संख्या ३,८३५ झाली आहे.

पुन्हा कोविड बाधितांची संख्या वाढतेय

सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे पुन्हा कोविड बाधितांची संख्या वाढत आहे. जनतेने कोविडपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क परिधान करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. बुस्टर डोस न चुकता घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केेले आहे.

हेही वाचा:देव तारी त्याला कोण मारी? पाण्यासोबत ‘देवाची’ मूर्ती…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!