CORONA UPDATE | गुरुवारी कोरोनाने घेतले तब्बल 44 बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: राज्यातील कोरोना परिस्थिती अजून जैसे थे आहे. ना कोरोनाबाधितांचा आकडा कमी होतोय, ना मृत्यूतांडव. मृतांचा आकडा थोड्याफार फरकाने कमी जास्त होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण कायम आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 44 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 2 हजाराच्या पुढे गेलाय. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे तब्बल 2 हजार 272 रुग्ण दगावले आहेत. रोजची वाढणारी ही आकडेवारी घाबरवून सोडणारी आहे.

गुरुवारची कोरोना आकडेवारी
राज्यात गुरुवारी तब्बल 1 हजार 582 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोविडबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या ही 20 हजार 808 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 189 जण कोरोनातून बरे होऊन त्यांना डिश्चार्ज देण्यात आलाय. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 83.70 टक्के एवढा झाला आहे. दुसऱ्या बाजूने 201 नवे कोरोनाबाधित हॉस्पिटलमध्ये एडमिट झाले आहेत तर 1 हजार 381 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलं आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 694 रुग्ण कोरोनातून बरे झालेत.

कुठे किती रुग्ण?
राज्यातील उत्तर गोव्यात डिचोलीत 529, साखळीत 637, पेडण्यात 800, वाळपई 585, म्हापसा 709, पणजीत 1233, हळदोण 832, बेतकी 584, कांदोळीत 922, खोर्ली 500, चिंबल 1164, शिवोलीत 726, तर पर्वरीत सर्वाधिक 1454 रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात कुडचडेत 673, वास्कोत 765, कांसावलीत 925, कुठ्ठाळीत 873, फोंड्यात 1095, कुडतरी 589, तर मडगावात सर्वाधिक 1925 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडलेत.
हेही वाचाः खतांवरील अनुदान वाढवण्याचा केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय
काळजी घ्या, सुरक्षित रहा
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जातेय. रोज कोरोनाची वाढती प्रकरण आणि कोरोनामुळे वाढणारी मृतांची संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाला जर पळवून लावायचं असेल, तर आपणच स्वतःची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मास्क वापरणं, सॅनिटायझर लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे.