CORONA UPDATE | राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

कोविड चाचण्यांच्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण घटलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोरोनाची आकडेवारी काही अंशी दिलासा देणारी आहे. बुधवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार राज्यात दिवसातील कोविड चाचण्यांच्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी होताना दिसतंय. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालाय. मात्र मृत्यू चक्र अजून कायम आहे. जरी मृतांची संख्या घटली असली, तरी ती शून्यावर आलेली नाही. त्यामुळे ‘एका डोळ्यात आनंद एका डोळ्यात पाणी’ अशीच काहीशी परिस्थिती राज्यात पाहायला मिळतेय.

बुधवारची कोरोना आकडेवारी

आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिनच्या आकडेवारीनुसार बुधवारी राज्यात 192 नवे कोविडबाधित सापडलेत. मागच्या 24 तासांत 5 हजार 22 नव्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून 192 जणांचे कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेत. हा आकडा निश्चितच काही अंशी दिलासा देणारा ठरतोय. 192 नव्या कोविडबाधितांपैकी 22 जण हॉस्पिटलमध्ये कोविडवरील उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. तर 170 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलंय. सध्या राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 950 एवढी आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट वाढतोय

बुधवारच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधील कोरोनाच्या आकडेवारीनंतर राज्याचा रिकव्हरी रेट 97.01 टक्के नोंद झालाय. मागच्या 24 तासांत 196 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 20 जण पूर्णपणे बरे झाले असल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हेही वाचाः पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, दुप्पट मिळेल फायदा

मृत्यू चक्र अजूनही कायम

बुधवारी 3 लोकांना कोविडमुळे मरण आलंय. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या आता ३ हजार 82 वर पोहोचला आहे. रोज कोविड मृतांचा आकडा हा थोड्याफार फरकाने वर खाली होताना दिसतोय. मात्र तो अजून पूर्णपणे शून्यावर आलेला नाही. त्यामुळे जरी राज्यातील कोरोनाचा आकडा घटत असला तरी मृतांची संख्या कायम असल्याने राज्याची काळजी अजून संपूर्णपणे मिटलेली नाही.

नवे कोविड रुग्ण सापडण्याचं प्रमाण घटतंय

आताच्या घडीला उत्तर गोव्यात कोविड रुग्ण सापडण्याचं प्रमाण हे 100 च्या घरात असल्याचं पाहायला मिळतंय. तर दक्षिण गोव्यात मडगाव, कुठ्ठाळी आणि फोंडा या तीन ठिकाणी कोविड रुग्ण सापडण्याचं प्रमाण हे 100 च्या वर असल्याचं दिसतंय.

हा व्हिडिओ पहाः Video | COVID HELP | कोविड बळींच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!