CORONA UPDATE | राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांच्या पार

मृत्यू चक्र अजूनही कायम; नव्या कोविड बाधितांचा आकडा घटतोय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: सोमवारी राज्यात 2 लोकांना कोविडमुळे मरण आलंय. आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून हा आकडा समोर आलाय. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३ हजार 75 वर पोहोचला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरीही अजूनही राज्यातील कोरोना बळींची चिंता ही कायमच आहे.

गेल्या 24 तासातील कोरोना आकडेवारी

राज्यात सोमवारी आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नव्या 130 रुग्णांची भर पडली आहे. 281 रुग्णांना गेल्या 24 तासांत कोरोनावर मात केल्याचं पाहायला मिळालंय. राज्याचा रिकव्हरी रेट हा आता 97.01 टक्क्यांवर गेल्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे.

12 रुग्णांना मिळाला डिश्चार्ज

दरम्यान, सोमवारी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 16 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नव्या रुग्णांपैकी 114 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

हेही वाचाः UPDATE | नारायण नाईक हल्लाप्रकरणाचा तपास आता क्राईम ब्रांचकडे

1  हजार 934 रुग्णांवर उपचार सुरु

राज्याचा रिकव्हरी रेट सुधारतो आहे. तर सक्रिय रुग्णसंख्याही हळूहळू घटतेय. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात एकूण 1  हजार 934 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!