CORONA UPDATE | नवे कोविड सापडण्याचं प्रमाण घटलं

कोरोना मृतांचं चक्र सुरूच; रिकव्हरी रेट वाढतोय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याच नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण कमी होतंय. गुरुवारी नवे कोरोना बाधित सापडण्याचा आकडा 100 च्या घरात असलेला पाहायला मिळालाय. त्यामुळे आरोग्य विभागाकडून दिलासा व्यक्त करण्यात येतोय. पण दुसऱ्या बाजूने कोविड मृतांचा आकडा अजूनही सक्रीय आहे. रोज 2 ते 4 मृत्यू होत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. मात्र राज्याचा रिकव्हरी रेट वाढता असल्यानं थोडं समाधान आहे. एकूण विचार केला गेला, तर राज्यातील कोविडची परिस्थिती हळुहळू सुधारताना दिसतेय.

गुरुवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात 97 नवे कोरोनाबाधित सापडलेत. गुरुवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 376 वर पोहोचलीये. मागच्या 24 तासांत 3 हजार 753 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. गुरुवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 18  जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 79 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट स्थिर

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट हा स्थिर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतोय. बुधवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.36  टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 129 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 13 जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः BAKARI EID | कोविडचे नियम पाळून फक्त 15 जणांकडून प्रार्थना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!