CORONA UPDATE | रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५० टक्के

मागील २४ तासांत २४० नवे रुग्ण तर ३९० जण झाले बरे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: राज्यात कहर केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता हळूहळू कमी होताना पाहायला मिळतोय. मंगळवारच्या कोविड आकडेवारीनंतर राज्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९६.५० टक्के झालाय. रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूदराची चिंता अजूनही कायम आहे.

24 तासांत सापडले 240 नवे रुग्ण

गेल्या २४ तासांत राज्यात 240  नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 390 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान,  40  रुग्ण हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून 200 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

24 तासांत एवढ्या चाचण्या

महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात एकूण 3 हजार 145 चाचण्या करण्यात आल्यात. दरम्यान, चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचं प्रमाणही कमी झालंय. संपूर्ण देशासह राज्यातही कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. सध्याच्या घडीला राज्यात 2 हजार 765 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 47 रुग्णांचा दिवसभरात डिस्चार्जही देण्यात आला आहे.

मृत्यू दराची चिंता

राज्याचा रिकव्हरी रेट जरी वाढला असला, तरी मृत्यू दर अजूनही शून्यावर आलेला नाही. मागच्या 24 तासांच राज्यात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील गोमेकॉतच ५ रुग्णांचा मृत्यू झालाय.  त्यामुळे आता राज्याचा एकूण मृतांचा आकडा 3  हजार 13  एवढा झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!