CORONA UPDATE | राज्यातील नव्या कोविडबाधितांची संख्या घटली; मृतांचा आकडा वाढला

राज्याच्या कोविड आकडेवारीमध्ये चढ-उतार कायम; रिकव्हरी रेट स्थिर; काणकोणात सापडले कोरोनाचे 12 रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: शनिवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार मृतांचा आकडा किंचित वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र दिलासादायक गोष्ट अशी की शुक्रवारी आढळून आलेल्या नव्या कोविडबाधितांच्या तुलनेत शनिवारी सापडलेल्या नव्या कोविडबाधितांचा आकडा हा कमी आहे. त्यामुळे चिंतेसोबत थोड्याप्रमाणात दिलासा व्यक्त केला जातोय.

शनिवारची कोविड आकडेवारी

आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिनच्या आकडेवारीनुसार शनिवारी राज्यात 155 नवे कोविडबाधित सापडलेत. मागच्या 24 तासांत 4 हजार 791  नव्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून 155 जणांचे कोविड अहवाल पॉझिटिव्ह आलेत. 155 नव्या कोविडबाधितांपैकी 26 जण हॉस्पिटलमध्ये कोविडवरील उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. तर 129 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलंय. सध्या राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 960 एवढी आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट स्थिर

शनिवारच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधील कोरोनाच्या आकडेवारीनंतर राज्याचा रिकव्हरी रेट 97 टक्के नोंद झालाय. मागच्या 24 तासांत 183 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 20 जण पूर्णपणे बरे झाले असल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हेही वाचाः मोठी बातमी | भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

काणकोणात सापडले कोरोनाचे १२ रुग्ण

शनिवारी काणकोणात कोरोनाचे १२ रुग्ण सापडलेत. त्यात आगोंद ७, नगरपालिका क्षेत्र १, श्रीस्थळ २ आणि पैंगीण २ रुग्ण आहेत. आतापर्यंत काणकोणात एकूण ३ हजार ३१८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णाची संख्या ६२ आहे.

शनिवारी मृतांचा आकडा वाढला

शनिवारी 7 लोकांना कोविडमुळे मरण आलंय. यातील 4 मृत्यू जीएमसीत, 2 दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात, तर मडगाव येथील व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झालाय. शनिवारच्या कोविड मृतांच्या आकडेवारीनंतर राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या आता 3 हजार 95 वर पोहोचला आहे. रोज कोविड मृतांचा आकडा हा थोड्याफार फरकाने वर खाली होताना दिसतोय. मात्र तो अजून पूर्णपणे शून्यावर आलेला नाही. त्यामुळे जरी राज्यातील कोरोनाचा आकडा घटत असला तरी मृतांची संख्या कायम असल्याने राज्याची काळजी अजून संपूर्णपणे मिटलेली नाही.

हा व्हिडिओ पहाः Video | ACCIDENT | चिंचेचं झाड कोसळून ज्येष्ठ नागरिक जखमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!