CORONA UPDATE | नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

मृत्यू दराची चिंता कायम; शुक्रवारी 4 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः नवे कोविडबाधित सापडण्याचा आकडा हळुहळू कमी होतोय. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येतोय. पण दुसऱ्या बाजूने कोविड मृतांचा शून्यावर पोहोचलेला आकडा पुन्हा सक्रीय झाल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. शुक्रवारी कोविडमुळे चौघांचा मृत्यू झालाय. शुक्रवारच्या कोविड मृतांच्या आकडेवारीनंतर राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 106 वर पोहोचलाय. मात्र एकूणच पाहता राज्यातील कोविडची परिस्थिती हळुहळू सुधारताना दिसतेय.

शुक्रवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार शुक्रवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण हे 120 राहिलंय. मागच्या काही दिवसांचे आकडे पाहता बुधवारचा आकडा किंचित वाढला होता. मात्र गुरुवार आणि शुक्रवारी हा आकडा कमी झाल्याचं दिसतंय. शुक्रवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 659 वर पोहोचलीये. मागच्या 24 तासांत 4 हजार 430 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण जरी कमी आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 13 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 105 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट वाढतोय

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट हा स्थिर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतोय. शुक्रवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.19 टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 236 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 15 जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | MURDER | महाराष्ट्रातील दोघा संशयितांना अटक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!