CORONA UPDATE | दिलासादायक! कोरोनाबाधितांच्या मृत्यूला लागला ब्रेक

बुधवारी नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण वाढलं; नवे रुग्ण सापडण्याचा आकडा 200 पार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मागचे काही महिने कोरोनाने घातलेलं मृत्यूचं थैमान हळुहळू कमी होतंय असंच म्हणावं लागेल. बुधवारची राज्यातील कोरोना आकडेवारी दिलासादायक ठरली आहे. कोरोना मृतांच्या आकडेवारीला बुधवारी ब्रेक लागला आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून दिलासा व्यक्त केला जातोय. बुधवारी कोविडमुळे राज्यात शून्य मृत्यू झालेत. ही बाब राज्यासाठी निश्चितच आनंदाची म्हणावी लागेल. मात्र नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बुधवारी किंचित वाढलंय.

काय सांगते बुधवारची कोरोना आकडेवारी?

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार बुधवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण हे 227 राहिलंय. मागच्या काही दिवसांचे आकडे पाहता बुधवारचा आकडा किंचित वाढलेला दिसतोय. बुधवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 788 वर पोहोचलीये. मागच्या 24 तासांत 5 हजार 651 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण जरी कमी असलं, तरी थोडी चिंता आहेच. बुधवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 22 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 205 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट स्थिर

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट हा स्थिर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतोय. बुधवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.11 टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 171 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 15 जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हेही वाचाः नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लईचं गोव्यात आगमन

मागच्या 24 तासांत शून्य मृत्यू

बुधवारच्या दिवसातील कोविड आकडेवारीमधील आनंदाची गोष्ट म्हणजे बुधवारी कोरोनामुळे राज्यात शून्य जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आरोग्य विभागाकडून थोडा दिलासा व्यक्त केला जातोय. आतापर्यंत राज्यात कोविडमुळे 3 हजार 101 जणांना मरण आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!