CORONA UPDATE | राज्यातील कोविड मृतांचं चक्र पुन्हा सक्रीय

गुरुवारी राज्यात कोविडमुळे दोघांचा मृत्यू; नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण 100 च्या घरात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातील कोविड परिस्थितीबाबत दिलासादायक वृत्त हाती येतं म्हणेस्तोवर पुन्हा चिंतेचे काळे ढग दाटून येतात. राज्यात गुरुवारी शून्यावर आलेली मृतांची संख्या पुन्हा सक्रीय झालीये. गुरुवारी दोघांचा कोविडमुळे मृत्यू झालाय. तर दिलासादायक बाब म्हणजे नवे कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण 100 च्या घरात आलंय. आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधून ही आकडेवारी समोर आलीये. राज्याचा रिकव्हरी रेट हळुहळू वाढतोय.

गुरुवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात 88 नवे कोरोनाबाधित सापडलेत. गुरुवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 993 झालीये. मागच्या 24 तासांत 5 हजार 229 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. गुरुवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 17 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 71 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट स्थिर

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट स्थीर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतायत. गुरुवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.59 टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 76 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 11 जण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | Nude Ragging | Crime Update | अखेर तुरुंग महानिरीक्षकांकडून निलंबनाची कारवाई

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!