CORONA UPDATE | राज्याचा रिकव्हरी, पॉझिटिव्हीटी रेट वाढला; मात्र तरीही चिंता

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येते म्हणेपर्यंत पुन्हा शनिवारी कोरोना मृतांची संख्या वाढलीये. शनिवारी तब्बल 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आहे. राज्याचा रिकव्हरी तसंच पॉझिटिव्हिटी रेट वाढलाय, जी आनंदाची गोष्ट आहे. दक्षिण गोव्यातील कोरोनाबाधितांची संख्यादेखील 500 च्या आत असल्याने दक्षिण गोव्याला दिलासा मिळालाय.
शनिवारची कोरोना आकडेवारी
राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार शनिवारी राज्यात 472 नवे कोरोनाबाधित सापडलेत. यातील 402 जणांनी होम आयझोलेशन स्विकारलं असून 70 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. सध्या राज्यात 5 हजार 57 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
रिकव्हरी, पॉझिटिव्हीटी रेट वाढला
मागच्या 24 तासांच राज्यात 601 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 42 जण पूर्ण बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेटची नोंद 95.08 टक्के झाली आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 14.40 टक्क्यांवर पोहोचलाय. राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.
coronavirus-test-1606815937
चाचण्यांची संख्याही वाढली
मागच्या 24 तासांत 3 हजार 278 जणांनी कोरोनाची चाचणी केली आहे. यातील 472 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा बराच कमी असल्याने त्या दृष्टीने थोडा दिलासा आहे.