CORONA UPDATE | दोडामार्गातून गोव्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ आहे नवीन नियम

गोव्यात ये-जा करणाऱ्यांसाठी कोरोना टेस्ट सक्तीची, दोन दिवसांची मुदत

Goan Varta Live | प्रतिनिधी

दोडामार्ग: नियमित नोकरीला दोडामार्ग तालुक्यातून गोव्यात ये-जा करणाऱ्यांसाठी आता येत्या दोन दिवसात आपली आरटीपीसीआर कोरोना टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. अन्यथा गोव्यात ये-जा करणाऱ्या कामगारांना दोडामार्गमध्ये प्रवेश मिळणार नाही असा निर्णय दोडामार्गचे तहसीलदार अरुण खानोलकर यांनी घेतला आहे.

हेही वाचाः BREAKING | केंद्राचा मोठा निर्णय! 1 मेपासून १८ वर्षांवरील सगळ्यांचं कोरोना लसीकरण

फक्त दोन दिवसांची मुभा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी शेवटचा तालुका असलेल्या दोडामार्गमधील हजारो युवक-युवती गोव्यात कामधंद्यासाठी रोज ये-जा करतात. महाराष्ट्रात कोरोनाला लगाम घालण्यासाठी संचारबंदी सुरू असून गोव्यात कामाला जाणाऱ्या लोकांना यातून सूट देण्यात आली होती. मात्र गोवा राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहून अखेर तालुक्यातीलसुद्धा कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी सोमवारी कडक निर्णय घेतला आहे. तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आता गोव्यात ये-जा करण्यासाठी फक्त दोन दिवसाची त्यांनी मुभा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | ‘या’ मंत्र्याने केली चक्क ६७ वेळा कोरोना चाचणी!

आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची

येत्या दोन दिवसात गोव्यातून ये-जा करणाऱ्या चाकरमानी व कामगारांनी आपली आरटीपीसीआर टेस्ट ग्रामिण रुग्णालय, साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करून घ्यावयाची आहे. ही टेस्ट पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही टेस्ट कंपल्सरी असून ज्यांच्याकडे या टेस्टचा रिपोर्ट नसेल त्यांना दोडामार्गमध्ये यापुढे प्रवेशद्वारावर प्रतिबंध केला जाणार आहे. तशा सूचना सोमवारी सायंकाळपासून तहसीलदार यांनी चेकपोस्टवर गोव्यातून ये-जा करणाऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. शिवाय गोव्यातून ये-जा करणाऱ्या सर्व कामगारांना तसे आवाहन केलं आहे. दोन दिवसानंतर जर कामानिमित्त गोव्यात ये-जा करायचं असल्यास आरटीपीसीआर टेस्ट नसेल तर त्यांना ये जा करता येणार नाहीय. शिवाय एकदा टेस्ट केल्यावर पुढील दहा दिवस त्यांना मुभा मिळणार आहे. अशीही माहिती दोडामार्ग तहसीलदार श्री. खानोलकर यांनी दिली आहे.

हेही वाचाः कोरोना हा रोग नाही, हा चीनचा डॅंबिसपणा – संभाजी भिडे

कोणाचीच गैरसोय होणार नाही

दोडामार्गसह उद्यापासून आयी आणि सासोली याठिकाणी नव्याने चेकपोस्ट नाके उभारले जाणार असून तसे आदेश त्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावं. आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी सुलभ सुविधा मिळेल. कोणाचीही गैरसोय होणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तर पेट्रोलसाठी गोवा गेट ओलांडून येजा करणाऱ्या बाबतही अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः धड्ड्याम! कोरोनाचा फटका, शेअर बाजार हजारपेक्षा जास्त अंकांनी कोसळला

आगामी काळात अधिक कडक पद्धतीने सांचारबंदी

इतकंच नव्हे तर दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, बांधकाम विभागाचे विजय चव्हाण, नगरपंचायत सीईओ शिवाजी गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. करतसकर, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. एवळे यांच्या समवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली असून आगामी काळात अधिक कडक पद्धतीने सांचारबंदीची अंमलबजावणीचे संकेत यातून मिळत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!