CORONA UPDATE | पॉझिटिव्ह बातमी! कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या पार

24 तासांत 581 रुग्ण झाले बरे; तर 14 लोकांचा कोविडमुळे मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आता एक पॉझिटिव्ह बातमी. कोरोना रिकव्हरी रेट रविवारी 95 टक्क्यांच्या पार गेलाय. हळुहळू राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येतेय, जी चांगली गोष्ट आहे. रविवारी राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा 95.19 टक्के नोंद झालाय. त्यामुळे थोडं हायसं वाटतंय. नव्या कोरोनाबाधितांचा आकडादेखील कमी होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण थोडा कमी झाल्याचं दिसतंय. मात्र कोरोनामुळे होणारे मृत्यू काही कमी झालेले नाहीत. त्यामुळे त्या दृष्टीने थोडी काळजी आहे.

रविवारची कोरोना आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार रविवारी राज्यात 420 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या आत आल्याने ही गोष्ट सकारात्मक म्हणावी लागेल. हळुहळू नवे कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण उतरू लागलंय. रविवारी मिळालेले 420 नवे कोरोनाबाधित धरून राज्यात सध्या 4 हजार 882 सक्रीय कोरोनाबाधित आहेत.

24 तासांत 3002 कोरोना चाचणी

मागच्या 24 तासात राज्यात 3 हजार 2 नव्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री तसंच आरोग्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन केल्यामुळे गोंयकार आता कोविड लक्षण दिसताच कोरोना चाचणी करायला प्राधान्य देताना दिसतायत. त्यामुळे कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. 24 तासांत झालेल्या 3 हजार 2 कोविड चाचण्यांपैकी 420 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आलाय. यापैकी 370 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलं असून 50 जण हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झालेत. तर मागच्या 24 तासांच 581 जणांनी कोरोनावर मात केली असून यातील 57 जणांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

कोविड मृतांमुळे राज्याची चिंता कायम

जरी राज्यात नवे कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण कमी होत असलं तरी कोविड मृतांची संख्या मात्र अजूनही चिंताजनक आहे. रविवारी राज्यात 14 जणांना कोविडमुळे मरण आलंय. रविवारी 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील एकूण कोविड मृतांचा आकडा 2 हजार 928 वर जाऊन पोहोचलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!