CORONA UPDATE | दिलासादायक! रुग्ण संख्या घटली; रिकव्हरी रेट वाढला

शुक्रवारी 413 नव्या कोविडबाधितांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळुहळू कमी होताना दिसतेय. राज्याचा रिकव्हरी तसंच पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय, जी आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचबरोबर कोविडमुळे होणारे मृत्यू अद्याप कमी झालेले नाहीत. त्यामुळे एका डोळ्यात हासू तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी सध्या राज्याची परिस्थिती आहे. दक्षिण गोव्यातील कोरोनाबाधितांची चढी असलेली संख्या हळुहळु खाली येतेय. त्यामुळे दक्षिण गोव्याला काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

गुरुवारी 413 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण 500 च्या आत आहे. गुरुवारी 413 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीये. यातील  346  जणांनी होम आयझोलेशन स्विकारलं असून 67  जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. सध्या राज्यात 5 हजार 605 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

मागच्या 24 तासांत 86 जणांना मिळाला डिश्चार्ज

मागच्या 24 तासांच राज्यात 585 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 86 जण पूर्ण बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेटची नोंद 94.73 टक्के झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.

चाचण्यांचं प्रमाण वाढलं

हळुहळू लोकांमध्ये जागृती निर्माण होत असल्याने कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. मागच्या 24 तासांत 3 हजार 298 जणांनी कोरोनाची चाचणी केली आहे. यातील 413 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा बराच कमी असल्याने त्या दृष्टीने थोडा दिलासा आहे.

मृत्यूदरामुळे राज्याची चिंता कायम

राज्याच्या रिकव्हरी रेट जरी वाढत असला, कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होत असली, तरी राज्याची चिंता अजूनही संपलेली नाही. गुरुवारी तब्बल 13 जणांच्या कोरोना लढाईत हार झालीये. गुरुवारी राज्यात 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील गोमेकॉत 7, दक्षिण गोवा हॉस्पिटलात 2 तसंच  मणिपाल, हेल्थवे, त्रिमुर्ती, ग्रेस कार्डियाकमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. 4 जूनला मृत्यू आलेल्या एका रुग्णाची उशीरा नोंद झालीये. त्यामुळे कोविड बळींची एकूण संख्या 2891 झालीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!