CORONA UPDATE | कोविड चाचण्यांचा आकडा वाढला

मृतांचा आकडा 3 हजाराच्या पार; गेल्या 24 तासांत आणखी 11 जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: राज्यात कहर केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता हळूहळू कमी होताना पाहायला मिळतोय. मंगळवारच्या कोविड आकडेवारीनंतर राज्यातील एकूण मृतांचा आकडा हा 3 हजाराच्या पार गेल्याचं समजतंय. त्यामुळे रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूदराची चिंता अजूनही कायम आहे.

गेल्या 24 तासातील कोरोना आकडेवारी

गेल्या २४ तासांत राज्यात 303 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 438 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान,  42  रुग्ण हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून 261 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

चाचण्यांचं प्रमाण वाढलं

महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात एकूण 4 हजार 311 चाचण्या करण्यात आल्यात. दरम्यान, चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचं प्रमाणही कमी झालंय. संपूर्ण देशासह राज्यातही कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. सध्याच्या घडीला राज्यात 2 हजार 920  सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 26  रुग्णांचा दिवसभरात डिस्चार्जही देण्यात आला आहे.

रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या पार

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या पार गेला आहे. सध्याच्या घडीला राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.41 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोविड केअर सेंटरमधील खाटाही रिकाम्या असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलंय.

हेही वाचाः ‘समृद्ध गोवा’ चळवळीत सहभागी व्हा

मृत्यू दराची चिंता कायम

राज्याचा रिकव्हरी रेट जरी वाढला असला, तरी मृत्यू दर अजूनही शून्यावर आलेला नाही. मागच्या 24 तासांच राज्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे आता राज्याचा एकूण मृतांचा आकडा 3  हजार 8  एवढा झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!