CORONA UPDATE | दिलासादायक | पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह रुग्ण जास्त

सोमवारी राज्यात 46 जणांचा कोविडमुळे मृत्यू

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरत आहे. त्याचप्रमाणे तो राज्यातही वाढतोय. कोरोना मृतांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ आहे. या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा निगेटिव्ह रुग्ण जास्त दिसून आलेत. मात्र मृत्यूदराची चिंता अजूनही कायम आहे.

सोमवारीची कोरोना रुग्णांची आकडेवारी

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 हजार 703 नव्या रुग्णांची भर पडली आहे. 6013 जणांचे कोविड अहवाल आले असून त्यात 3310 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. राज्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचं प्रमाण हे 44.95 टक्के आहे. आतापर्यंत राज्यात 98 हजार 088 कोविड रुग्ण सापडलेत. तर 25 हजार 839 सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचाः बार्देश तालुक्यामध्ये अजून 16 मायक्रो कंटेन्मेन्ट झोन

राज्याचा मृत्यूदर, चिंतेत भर

राज्याचा मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे. मागील 24 तासांत राज्यात 1 हजार 425 जण कोरोनातून बरे झालेत. राज्यात कोरोना रुग्ण दगावण्याचा आकडा हा 46 आहे. मृतांची संख्या कमी होत नसल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. राज्यातील आरोग्य संचालनालयाच्या माहितीप्रमाणे मागील 24 तासाच 1 हजार 425 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 72.31 टक्के आहे.

हेही वाचाः वेर्ला-काणकानंतर इतरही ग्रामपंचायतींचा कॉन्फिडन्स वाढला! कुठ्ठाळीतही निर्णय झाला

कुठे किती रुग्ण दगावले

सोमवारच्या कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकडेवारीनुसार एकूण 46 मृत्यू झालेत. त्यातील 14 मृत्यू द.गो.जि.रुग्णालयात झालेत, 24 जीएमसीत, 3 सांगेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, 1 मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये, 1 उ.गो. खासगी रुग्णालयात, 1 उ.गो.जि.रुग्णालयात, तर एकाचा धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झालाय.

हेही वाचाः सरकार गोंयकारांना खासगी रुग्णालयात जास्ती खर्चात लसीकरणासाठी भाग पाडतंय?

कुठे किती रुग्ण?

राज्यातील उत्तर गोव्यात डिचोलीत 1022, साखळीत 798, पेडण्यात 738, वाळपईत 515, म्हापसा 1439, पणजीत 1574, हळदोण 580, कोलवाळ 537, खोर्ली 574, कांदोळीत 1597, चिंबल 762, शिवोलीत 854, तर पर्वरीत सर्वाधिक 1283 रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात कुडचडेत 625, काणकोण 610, वास्कोत 665, कांसावलीत 963, कुठ्ठाळीत 1307,  कुडतरी 533, लोटली 518, धारबांदोडा 581, फोंड्यात 1434, तर मडगावात सर्वाधिक 2454 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडलेत.

पाहा सविस्तर व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!