CORONA UPDATE | चांगली बातमी! रुग्ण बरे होण्याचा दर वाढला

मृतांचा आकडा एक अंकी; राज्याची सक्रिय रुग्ण संख्या ३ हजाराच्या पुढे

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कहर केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता हळूहळू कमी होताना पाहायला मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूदराची चिंता अजूनही कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील मृत्यू घटले असले तरी कोविड बळींचा आकडा हा ३ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

रविवारची कोरोना आकडेवारी

गेल्या २४ तासांत राज्यात 207 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 406 रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, 27 रुग्ण हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून 180 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

24 तासांत एवढ्या चाचण्या

महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात एकूण 2 हजार 442 चाचण्या करण्यात आल्यात. दरम्यान, चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचं प्रमाणही कमी झालंय. संपूर्ण देशासह राज्यातही कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. सध्याच्या घडीला राज्यात 3 हजार 268 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 45 रुग्णांचा दिवसभरात डिस्चार्जही देण्यात आला आहे.

रिकव्हरी रेट वाढला

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या पार गेला आहे. सध्याच्या घडीला राज्याचा रिकव्हरी रेट हा 96.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोविड केअर सेंटरमधील खाटाही रिकाम्या असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलंय.

एवढ्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्याचा रिकव्हरी रेट जरी वाढला असला, तरी मृत्यू दर अजूनही शून्यावर आलेला नाही. मागच्या 24 तासांच राज्यात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे आता राज्याचा एकूण मृतांचा आकडा 2 हजार 990 एवढा झालाय. रविवारी झालेल्या कोविड मृत्यूंमध्ये गोमेकॉत 3, दक्षिण जिल्हा इस्पितळात 2, तर रेडकर हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीला कोरोनामुळे मरण आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!