CORONA UPDATE |शुक्रवारी कोविड मृत्यू चक्र कायम

नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण 100 च्या वर; रिकव्हरी रेट स्थिर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण पुन्हा एकदा 100 च्या बाहेर जाऊन पोहोचलंय. तर मृत्यू चक्र कायम आहे. शुक्रवारी कोविडमुळे दोघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नाही म्हटलं तरी चिंता आहेच. राज्याचा रिकव्हरी रेट स्थिर असल्याचं राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधून समोर आलंय. एकूणच राज्यातील कोविडची परिस्थिती हळुहळू सुधारताना असं म्हणायला हरकत नाही.

शुक्रवारी कोविडची आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार शुक्रवारी राज्यात 152 नवे कोरोनाबाधित सापडलेत. शुक्रवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 93 झालीये. मागच्या 24 तासांत 4 हजार 322 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 19 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 133 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट स्थिर

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट स्थीर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतायत. सोमवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.52  टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 134 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 15 जण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Politics | Delhi | Tito & Sharad Pawar | रिकार्डो डिसोझा भाजपात जाणार की एनसीपीत?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!