CORONA UPDATE | सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोविडबाधितांचं प्रमाण घटलं

शुक्रवारी नव्या 73 कोविडबाधितांची नोंद; कोविड मृत्यूचक्र मात्र कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्याच नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण कमी होतंय. सलग दुसऱ्या दिवशी नवे कोविड बाधित सापडण्याचा आकडा हा 100 च्या घरात नोंद झालाय. त्यामुळे काहीप्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येतोय. पण दुसऱ्या बाजूने कोविड मृतांचा आकडा अजूनही सक्रीय आहे. रोज 2 ते 4 मृत्यू होत असल्यानं चिंता अजूनही कायम आहे. मात्र राज्याचा रिकव्हरी रेट वाढता असल्यानं थोडं समाधान आहे. एकूण विचार केला गेला, तर राज्यातील कोविडची परिस्थिती हळुहळू सुधारताना दिसतेय.

शुक्रवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार शुक्रवारी राज्यात 73 नवे कोरोनाबाधित सापडलेत. शुक्रवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 307 वर पोहोचलीये. मागच्या 24 तासांत 3 हजार 31 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 12  जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 61 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

राज्याचा रिकव्हरी रेट सुधारतोय

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट हा वाढताना दिसतोय. त्यात किंचित चढ-उतार होतायत. शुक्रवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.40  टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 139 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 13 जण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | DEATH | साहित्यिक गोपाळराव मयेकर यांचं निधन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!