CORONA UPDATE | कोविड पॉझिटिव्हीटी दर घटला

सक्रिय रुग्ण ३५९९; चोवीस तासांत ५३४ रुग्ण बरे झाले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: आता एक पॉझिटिव्ह बातमी. कोविड पॉझिटिव्हीटी दर घटला आहे. तर रिकव्हरी रेट वाढतोय. त्यामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती हळुहळू आटोक्यात येतेय, जी चांगली गोष्ट आहे. तरी भीती संपलेली नाही. कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनामुळे जरी मृत्यू कमी झालेले असले तरी ते पूर्ण थांबलेले नाहीत. त्यामुळे अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

शुक्रवारची कोरोना आकडेवारी

शुक्रवारी राज्याचा कोरोना 315 नवे कोविड बाधित सापडलेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 599 वर जाऊन पोहोचली आहे. मागच्या 24 तासांत एकूण 4 हजार 20 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 315 जणांना कोरोनाचं निदान झालंय. यातील 274 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलेलं असून 41 जण उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती झालेत.

पॉझिटिव्ही दर घटतोय

राज्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्ही दर हा घटतोय. मागच्या 24 तासांतील राज्याचा पॉझिटिव्ही दर हा ७.८४ टक्के नोंद झालाय. तर रिकव्हरी रेटमध्ये हळुहळू वाढ होताना दिसतेय. मागच्या 24 तासांतील रिकव्हरी रेटवर नजर मारली असता तो 95.99 टक्के असल्याचं दिसतंय.

मागच्या 24 तासांच एवढे रुग्ण झाले बरे

मागच्या 24 तासांत 534 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याचं समोर आलंय. यातील 34 जण पूर्ण बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय. तर मागच्या 24 तासांत 6 जणांना कोरोनामुळे मरण आलाय. शुक्रवारच्या मृतांच्या आकडेवारीनंतर राज्यातील मृतांचा आकडा 2 हजार 975 एवढा झालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!