CORONA UPDATE | शुक्रवारी कोरोना मृतांचा आकडा घटला

कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय; मात्र कोरोना बळींची चिंता अजूनही कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: बुधवारी राज्यातील कोरोना बळींचा वाढलेला आकडा पुन्हा एकदा खाली आलाय. गेल्या २४ तासांत 2 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याचं आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३ हजार 62 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरीही अजूनही राज्यातील कोरोना बळींची चिंता ही कायमच आहे.

हा व्हिडिओ पहाः कोरोनामध्ये आम्हीच आर्थिक झळ का सहन करावी?

शुक्रवारची कोविड आकडेवारी

राज्यात शुक्रवारी आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नव्या 183 रुग्णांची भर पडली आहे. 285 रुग्णांना गेल्या 24 तासांत कोरोनावर मात केल्याचं पाहायला मिळालंय. राज्याचा रिकव्हरी रेट हा आता 96.87 टक्क्यांवर गेल्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे.

शुक्रवारी 29 रुग्णांना डिस्चार्ज

दरम्यान, शुक्रवारी 29 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर 21 रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नव्या रुग्णांपैकी 162 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

हेही वाचाः दिन हूँ रात हूँ, सांझ वाली बाती हूँ…मैं खाकी हूँ !

राज्याचा रिकव्हरी रेट सुधारतो

राज्याचा रिकव्हरी रेट सुधारतो आहे. तर सक्रिय रुग्णसंख्याही हळूहळू घटतेय. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात एकूण 2 हजार 174 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर शुक्रवारी दगावलेल्या 2 रुग्णांना धरुन एकूण मृत्यूसंख्याही 3 हजार 62 वर पोहोचली आहे.

हा व्हिडिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!