CORONA UPDATE | नव्या कोविडबाधितांची संख्या घटली

मृत्यू चक्र कायम; गुरुवारी कोविडचे आणखी 2 बळी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण घटलंय. मात्र मृतांची शून्यावर पोहोचलेली संख्य पुन्हा सक्रिय झालीये. गुरुवारी राज्यात पुन्हा एकदा कोविड मृतांचा नवा आकडा समोर आलाय. त्यामुळे नाही म्हटलं तरी चिंता आहेच. मात्र नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण 100 च्या घरात आल्यानं थोडा दिलासा व्यक्त केला जातोय. राज्याचा रिकव्हरी रेट वाढता असल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण थोडा का होईना, पण कमी होताना दिसतोय. राज्यातील कोविडची परिस्थिती हळुहळू सुधारताना असं म्हणायला हरकत नाही.

गुरुवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात 90 नवे कोरोनाबाधित सापडलेत. गुरुवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 77 झालीये. मागच्या 24 तासांत 3 हजार 876 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. गुरुवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 19 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 71 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी वाढत्या दिशेने

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट हा वाढताना दिसतोय. त्यात किंचित चढ-उतार होतायत. सोमवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.53  टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 93 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 14 जण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | पावसाळी अधिवेशन | बलात्कारप्रकरणावर सभागृहात वादळी चर्चा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!