CORONA UPDATE | गुरुवारी राज्यातील कोरोना रुग्णवाढीत पुन्हा घट

कोरोना बळींचं चक्र पुन्हा सक्रीय; गुरुवारी राज्यात कोविडमुळे एकाचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बुधवारी वाढलेला नव्या कोविडबाधितांचा आकडा गुरुवारी कमी झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त करण्यात येतोय. पण दुसऱ्या बाजूने कोविड मृतांचा शून्यावर पोहोचलेला आकडा गुरुवारी पुन्हा सक्रीय झाल्याचं पहायला मिळालंय. गुरुवारी कोविडमुळे एकाचा मृत्यू झालाय. गुरुवारच्या कोविड मृतांच्या आकडेवारीनंतर राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 102 वर पोहोचलाय. मात्र एकूणच पाहता राज्यातील कोविडची परिस्थिती हळुहळू सुधारताना दिसतेय.

गुरुवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार गुरुवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण हे 126 राहिलंय. मागच्या काही दिवसांचे आकडे पाहता बुधवारचा आकडा किंचित वाढला होता. मात्र गुरुवारी हा आकडा कमी झाल्याचं दिसतंय. गुरुवीरच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 779 वर पोहोचलीये. मागच्या 24 तासांत 4 हजार 63 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण जरी कमी आहे. गुरुवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 19 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 107 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

रिकव्हरी रेट स्थिर

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट हा स्थिर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतोय. बुधवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.12 टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 134 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 17 जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | Agro Story | ऊसाला बाय करत भाजीपाला उत्पादनात रमले राजेंद्र देसाई

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!