CORONA UPDATE |राज्यात कोरोना मृतांचा आकडा पुन्हा सक्रिय

मंगळवारी कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू; आरोग्य खात्याच्या कोविड बुलेटिनमधून आकडा समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारचा दिवस कोरोनाच्या बाबतीत दिलासादायक दिवस ठरला. राज्यात तब्बल आठ महिन्यांनंतर कोविडमुळे एकाही रुग्णाचा 24 तासांच्या कालावधीत मृत्यू झालेला नसल्याची नोंद करण्यात आली. मात्र मंगळवारी पुन्हा चिंतेने डोकं वर काढलं. राज्यात पुन्हा एकदा कोविड मृतांचा आकडा सक्रीय झाल्याचं मंगळवारी पाहायला मिळालंय.

हेही वाचाः युतीबाबत अद्याप विचार नाही

मंगळवारी तब्बल 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोरोना बुलेटिननुसार मंगळवारी राज्यात 4 लोकांना कोरोनामुळे मरण आलंय. मंगळवारच्या कोविड मृतांच्या आकडेवारीनंतर राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 101 झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याची आकडेवारी जरी कमी असली तरी कोविड मृत्यूंचं प्रमाण जोपर्यंत पूर्णपण शून्य नोंद होत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारलीये असं म्हणता येणार नाही.

मंगळवारची कोरोनाची आकडेवारी

आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधील आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी 164 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारच्या नव्या कोविडबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या आता 1 हजार 732 झाली आहे.

मागच्या 24 तासांत एवढ्या चाचण्या

मागच्या 24 तासांत तब्बल 4 हजार 282 कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. त्यातील 164 जणांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह नोंद झालेत. 164 जणांतील 16 जणांनी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती होणं पसंत केलंय, तर 148 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलंय.

राज्याचा रिकव्हरी रेट वाढला

राज्याच्या रिकव्हरी रेट वाढत असल्याचं दिसतंय, जी गोष्ट दिलासादायक आहे. मंगळवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.14 टक्के नोंद झालाय. मागच्या 24 तासांत 198 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 9 जण कोरोनातून पूर्ण बरे झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!