CORONA UPDATE | चिंता वाढली! कोविड मृतांचा आकडा वाढला

नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण घटलं; राज्याचा रिकव्हरी रेट स्थिर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातील कोविड परिस्थितीबाबत एक चिंतीत करणारं वृत्त हाती येतंय. राज्यावर पुन्हा चिंतेचे काळे ढग दाटून आलेत. राज्यात सोमवारी मृतांची संख्या वाढलीये. सोमवारी 5 जणांना कोविडमुळे मरण आलंय. यातील गोमेकॉत तिघांचा, तर दक्षिण जिल्हा इस्पितळात दोघांचा मृत्यू झालाय. दुसऱ्या बाजूने दिलासादायक बाब म्हणजे नवे कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण 100 च्या घरात आलंय. आरोग्य विभागाने जारी केलेल्या कोविड बुलेटिनमधून ही आकडेवारी समोर आलीये. राज्याचा रिकव्हरी रेट हळुहळू वाढतोय.

सोमवारची कोविड आकडेवारी

राज्यातील आरोग्य खात्याने जारी केलेल्या कोविड बुलेटिननुसार सोमवारी राज्यात 62 नवे कोरोनाबाधित सापडलेत. सोमवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर राज्यातील सक्रिय रुग्ण संख्या 873 झालीये. मागच्या 24 तासांत 4 हजार 225 कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत नवे कोविडबाधित सापडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. सोमवारी नोंद झालेल्या नव्या कोविडबाधितांपैकी 7 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत, तर 55 जणांनी होम आयसोलेशन स्वीकारलंय.

राज्याच्या रिकव्हरी रेट स्थीर

मागील काही दिवस राज्याचा रिकव्हरी रेट स्थीर आहे. त्यात किंचित चढ-उतार होतायत. सोमवारी राज्याचा रिकव्हरी रेट 97.65 टक्के नोंद झालाय. तर मागच्या 24 तासांत 96 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 4 जण पूर्णपणे बरे झाल्यानं त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः FENNY | SPECIAL COVER | पोस्टातर्फे काजू फेणीवर ‘स्पेशल कव्हर’ प्रकाशित

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!