CORONA UPDATE | दिलासादायक! राज्यातील कोविड आकडेवारी आटोक्यात

पॉझिटिव्हीटी रेट 11.75 टक्के; गेल्या 24 तासांत नव्या 423 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळुहळू कमी होताना दिसतेय. राज्याचा रिकव्हरी तसंच पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय, जी आनंदाची गोष्ट आहे. मात्र अजून कोविडमुळे होणारे मृत्यू शून्यावर आलेले नाहीत. त्यामुळे चिंता आहेच. दक्षिण गोव्यातील कोरोनाबाधितांची चढी असलेली संख्या बऱ्यापैकी खाली आलीये. त्यामुळे दक्षिण गोव्याला दिलासा मिळालाय.

हेही वाचाः आंतरमंत्रालयीन पथकाची बैठक; तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचा घेतला आढावा

शुक्रवारची कोरोना आकडेवारी

राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार शुक्रवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण 423 आहे. यातील  373  जणांनी होम आयझोलेशन स्विकारलं असून 50  जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. सध्या राज्यात 5 हजार 201 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

रिकव्हरी रेट वाढला

मागच्या 24 तासांच राज्यात 819 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 76 जण पूर्ण बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेटची नोंद 94.99 टक्के झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.

हेही वाचाः १८ जून रोजी राज्यात गोवा क्रांती दिवस समारंभ

शुक्रवारी एवढ्या झाल्या चाचण्या

लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्याने कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. मागच्या 24 तासांत 3 हजार 599 जणांनी कोरोनाची चाचणी केली आहे. यातील 423  जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा बराच कमी असल्याने त्या दृष्टीने थोडा दिलासा आहे.

शुक्रवारी 8 जणांचा मृत्यू

राज्याच्या रिकव्हरी रेट जरी वाढत असला, कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होत असली, तरी राज्याची चिंता अजूनही पूर्ण संपलेली नाही. शुक्रवारी 8 जणांच्या कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील गोमेकॉत 6, दक्षिण गोवा हॉस्पिटलात 1 तसंच उत्तर गोव्यातील हेल्थवे मध्ये एकाला कोरोनामुळे मरण आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!