CORONA UPDATE! खाजगी हॉस्पिटलात अजून 5 मृत्यू झाल्याचं उघड; तर 24 तासांत 473 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्याचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढतोय; मात्र तरीही राज्याची चिंता कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळुहळू कमी होताना दिसतेय. मात्र हळुहळू राज्यातील खासगी हॉस्पिटलात झालेले मृत्यूंचे आकडे समोर येतायत. सोमवारी 9 महिन्यात 67 जणांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पुन्हा नवे आकडे समोर आलेत. त्यामुळे राज्यातील खासगी हॉस्पिटल्सवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आलेत.

11 दिवसांत 5 जणांचा मृत्यू

मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार 26 मे ते 5 जून या 11 दिवसांच्या कालावधीत राज्यातील खाजगी हॉस्पिटलात आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. हळुहळू समोर येणारी ही आकडेवारी आता गोंयकारांच्या मनात भीती निर्माण करू लागलीये. हे 5 आकडे समोर आल्यानंतर आता राज्यातील कोविड मृतांचा आकडा 2859 वर पोहोचलाय.

हेही वाचाः राज्य सरकारने 59 कुटुंबांना दोन लाख रुपये दिले

मंगळवारी 473 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार मंगळवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण 500 च्या आत आहे. रविवारी 473  नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीये. यातील  399  जणांनी होम आयझोलेशन स्विकारलं असून 74  जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. सध्या राज्यात 5 हजार 899  कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

24 तासात 86 जणांना हॉस्पिटलमधून मिळाला डिश्चार्ज

मागच्या 24 तासांच राज्यात 1462 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 86 जण पूर्ण बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेट ची नोंद 94.54 टक्के झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.

हेही वाचाः COVAXIN | कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज

24 तासांच 3114 कोविड चाचण्या

हळुहळू लोकांमध्ये जागृती निर्माण होत असल्याने कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. मागच्या 24 तासांत 3 हजार 114 जणांनी कोरोनाची चाचणी केली आहे. यातील 399 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा बराच कमी असल्याने त्या दृष्टीने थोडा दिलासा आहे.

मंगळवारी 14 जणांचा कोविडने मृत्यू

राज्याच्या रिकव्हरी रेट जरी वाढत असला, कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होत असली, तरी राज्याची चिंता अजूनही संपलेली नाही. मंगळवारी तब्बल 14 जणांच्या कोरोना लढाईत हार झालीये. मंगळवारी राज्यात 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

हेही वाचाः २० रिफॉर्मस् इन २०२० पुस्तिकेचे प्रकाशन

एका डोळ्यात हासू, दुसऱ्या डोळ्यात आसू

राज्याचा रिकव्हरी तसंच पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय, जी आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचबरोबर कोविडमुळे होणारे मृत्यू अद्याप कमी झालेले नाहीत. त्यामुळे एका डोळ्यात हासू तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी सध्या राज्याची परिस्थिती आहे. दक्षिण गोव्यातील कोरोनाबाधितांची चढी असलेली संख्या हळूहळू खाली येतेय. त्यामुळे दक्षिण गोव्याला काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!