CORONA UPDATE | बापरे! गेल्या २४ तासांत तब्बल ३८ जणांचा मृत्यू

कोरोना बाधितांचा आकडा २ हजाराच्या पार

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः डबल म्युटेशनसह कोरोनाच्या विविध स्ट्रेनमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक बनलीय. राज्यात तर कोरोना बाधितांची आकडेवारी रोज नवनवे उच्चांक गाठतेय. त्याचबरोबर मृतांचा आकडा हा घाबरवून टाकणारा आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात कोविड बाधितांच्या आकडेवारीने सगळ्या सीमा पार केल्यात असंच म्हणावं लागेल. गेल्या 24 तासांत तब्बल कोविड बाधितांचा आकडा २ हजाराच्या पार गेलाय. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यानचा उच्चांक आहे. रुग्णावाढीबरोबरच राज्यात मृत्यूचं थैमानही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. राज्यात 24 तासांत ३८ रुग्णांनी प्राण गमावले.

24 तासात २ हजार ३२१ नवे कोरोना बाधित

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात होत असलेली रुग्णवाढ सोमवारी नव्या पातळीवर पोहोचली. सोमवारी जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांतील कोविड रुग्णांची आकडेवारी ही घाबरवणारी आहे. गेल्या २४ तासात २ हजार ३२१ नवे कोरोना बाधित सापडलेत. राज्यातील आरोग्य संचालनालयाकडून या काळजीत टाकणाऱ्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे.

काळजीत टाकणारी कोरोना रुग्ण आकडेवारी

राज्यातील आरोग्य संचालनालयाच्या माहितीप्रमाणे राज्यात गेल्या 24 तासांत २ हजार ३२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत राज्यात ३८ जणांचे प्राण कोरोनानं हिरावून घेतले. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात 24 तासांच्या काळातच ७१२ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 हजार ५५ जणांचा मृत्यू झाला असून, राज्याचा रिकव्हरी रेट हा ७९.५५ टक्के आहे.

कुठे किती रुग्ण?

राज्यातील उत्तर गोव्यात डिचोलीत ४२४, साखळीत ४२८, म्हापसा ८७८, पणजीत ९६८, कांदोळीत १३८०, खोर्लीत ३०९, चिंबल ५२९, शिवोलीत ५००, पर्वरीत सर्वाधिक १२७३ रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात वास्कोत ७४५, कांसावलीत ५११, कुठ्ठाळीत ८९०, फोंड्यात ८६३, तर मडगावात सर्वाधिक १४१८ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!