CORONA UPDATE | गेल्या 24 तासांत राज्यात 3 हजार 751 नव्या रुग्णांची नोंद

55 लोकांचा कोविडमुळे मृत्यू

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच आहेत. 50च्या पार गेलेला मृतांचा आकडा हा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण पसरलंय. शनिवारी राज्यात तब्बल 55 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 1 हजार च्या पार गेलाय. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे तब्बल 1 हजार 612 रुग्ण दगावले आहेत. रोजची वाढणारी ही आकडेवारी घाबरवून सोडणारी आहे.

राज्याचा मृत्यूदर, चिंतेत भर

राज्याचा मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे. जीएमसीत कोविड मृतांच्या रांगा लागल्या आहेत. सरणावर जाण्यासाठी मृतांना आता प्रतिक्षा करावी लागते, ज्याच्यासारखं दुसरं दुर्दैव अजून कुठलं नसावं. शनिवारी राज्यातील जीएमसीत 39, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 13 लोकांचा मृत्यू झाला. अन्यत्र 3 लोकांना कोविडमुळे मरण आलंय.

काळजीत टाकणारी कोरोना रुग्ण आकडेवारी

राज्यातील आरोग्य संचालनालयाच्या माहितीप्रमाणे राज्यात गेल्या 24 तासांत राज्यात 3 हजार 751 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत राज्यात 55 जणांचे प्राण कोरोनानं हिरावून घेतले. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात 24 तासांच्या काळातच 191 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा 70.74 टक्के आहे.

हेही वाचाः फ्रंटलाईन वर्कर्सच्या यादीत आता ‘या’ कर्मचाऱ्यांचा समावेश

कुठे किती रुग्ण?

राज्यातील उत्तर गोव्यात डिचोलीत 941, साखळीत 1416, पेडण्यात 1305, वाळपई 760, म्हापसा 1803, पर्वरीत 1454, हळदोण 803, बेतकी 773, कांदोळीत 1812, कोलवाळ 770, खोर्ली 739, चिंबल 1168, शिवोलीत 1103, तर पणजीत सर्वाधिक 1950 रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात कुडचडेत 757, वास्कोत 1017, कांसावलीत 975, कुठ्ठाळीत 1245, फोंड्यात 1817, शिरोडा 749, लोटली 846, तर मडगावात सर्वाधिक 2321 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!