CORONA UPDATE | राज्यात मृत्यूतांडव सुरूच

गेल्या 24 तासांच 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच आहेत. हळुहळू मृतांचा आकडा हा चढ्या दिशेने चाललाय. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण पसरलंय. गुरुवारी राज्यात तब्बल 36 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 1 हजाराच्या पुढे गेलाय. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे तब्बल 1146 रुग्ण दगावले आहेत. रोजची वाढणारी ही आकडेवारी घाबरवून सोडणारी आहे.

राज्याचा मृत्यूदर, चिंतेत भर

राज्याचा मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटही खालावला आहे. तसंच पॉझिटिव्हीटी रेटही भयंकर वाढलाय. 18 एप्रिलपासून मृतांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा 35 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. गुरुवारी राज्यातील जीएमसीत 24, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 10 तर आझिलो, म्हापशात दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काळजीत टाकणारी कोरोना रुग्ण आकडेवारी

राज्यातील आरोग्य संचालनालयाच्या माहितीप्रमाणे राज्यात गेल्या 24 तासांत 3 हजार 19 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत राज्यात 36 जणांचे प्राण कोरोनानं हिरावून घेतले. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात 24 तासांच्या काळातच 914 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 हजार 146 जणांचा मृत्यू झाला असून, राज्याचा रिकव्हरी रेट हा 74.96 टक्के आहे.

हेही वाचाः खाटांसह डॉक्टरांचीही कमतरता

कुठे किती रुग्ण?

राज्यातील उत्तर गोव्यात डिचोलीत 814, साखळीत 784, पेडण्यात 505, म्हापसा 1020, पणजीत 1343, कांदोळीत 1504, चिंबल 729, शिवोलीत 677, तर पर्वरीत सर्वाधिक 1392 रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात कुडचडेत 446, वास्कोत 776, कांसावलीत 812, कुठ्ठाळीत 1331, फोंड्यात 1219, तर मडगावात सर्वाधिक 1974 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!