CORONA UPDATE | गेल्या 24 तासांत 31 जणांचा मृत्यू

कोरोनाचं थैमान कायम; 24 तासात 2 हजार 110 नव्या कोरोना बाधितांची नोंद

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः डबल म्युटेशनसह कोरोनाच्या विविध स्ट्रेनमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक बनलीय. राज्यात तर कोरोना बाधितांची आकडेवारी रोज नवनवे उच्चांक गाठतेय. त्याचबरोबर मृतांचा आकडा हा घाबरवून टाकणारा आहे. राज्यात मंगळवारी कोविड बाधितांचा आकडा 2 हजाराच्या पार गेलाय. रुग्णावाढीबरोबरच राज्यात मृत्यूचं थैमानही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. राज्यात 24 तासांत 31 रुग्णांनी प्राण गमावले.

24 तासात 2 हजार 110 नवे कोरोना बाधित

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात होत असलेली रुग्णवाढ मंगळवारी दोन हजाराच्या घरात राहिली. मंगळवारी जवळपास 2 हजार 110 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांतील कोविड रुग्णांची ही आकडेवारी ही घाबरवणारी आहे. राज्यातील आरोग्य संचालनालयाकडून या काळजीत टाकणाऱ्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे.

काळजीत टाकणारी कोरोना रुग्ण आकडेवारी

राज्यातील आरोग्य संचालनालयाच्या माहितीप्रमाणे राज्यात गेल्या 24 तासांत 2 हजार 110 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत राज्यात 31 जणांचे प्राण कोरोनानं हिरावून घेतले. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे राज्यात 24 तासांच्या काळातच 748 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 हजार 86 जणांचा मृत्यू झाला असून, राज्याचा रिकव्हरी रेट हा 78.42 टक्के आहे.

हा व्हिडिओ पहाः Live Updates | कोरोना अपडेट्स, लईराईची जत्रा आणि दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

कुठे किती रुग्ण?

राज्यातील उत्तर गोव्यात डिचोलीत 585, साखळीत 511, म्हापसा 847, पणजीत 956, कांदोळीत 1392, चिंबल 589, शिवोलीत 515, तर पर्वरीत सर्वाधिक 1182 रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात कुडचडेत 318, वास्कोत 781, कांसावलीत 577, कुठ्ठाळीत 993, फोंड्यात 958, तर मडगावात सर्वाधिक 1764 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!