CORONA UPDATE | शुक्रवारी मृतांचा आकडा घटला; तर बाधितांचा आकडा वाढला

30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 1 हजार 625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्याचा रिकव्हरी रेट 84.89

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यातील कोरोनामुळे होणारे मृत्यू हळुहळू कमी होत आहेत. मृतांचा आकडा थोड्याफार फरकाने कमी जास्त होताना दिसतोय. पण असं असलं तरी राज्यात भीतीचं वातावरण कायम आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल 30 लोक कोरोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 2 हजाराच्या पुढे गेलाय. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे तब्बल 2 हजार 302 रुग्ण दगावले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारची कोविड मृतांची आकडेवारी पाहता 14 आकड्यांनी ती घटलीये.

हेही वाचाः मगोपच्या प्रवीण आर्लेकरांची चांदेल प्रकल्पावर धडक कार्यवाही

शुक्रवारची कोरोना आकडेवारी

राज्यात शुक्रवारी तब्बल 1 हजार 625 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कोरोनाबाधित सापडण्याची आकडेवारी वाढलीये. त्यामुळे आता राज्यातील कोविडबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या ही 19 हजार 328 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 187 जणांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आलाय. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 84.89 टक्के एवढा झाला आहे. दुसऱ्या बाजूने 207 नवे कोरोनाबाधित हॉस्पिटलमध्ये एडमिट झाले आहेत तर 1 हजार 438 जणांनी होम आयझोलेशन स्वीकारलं आहे. गेल्या 24 तासात 3 हजार 75 रुग्ण कोरोनातून बरे झालेत.

कुठे किती रुग्ण?

राज्यातील उत्तर गोव्यात साखळीत 564, पेडण्यात 645, वाळपई 515, म्हापसा 530, पणजीत 1133, बेतकी 543, कांदोळीत 921, चिंबल 1064, शिवोलीत 619, तर पर्वरीत 813 रुग्ण सापडलेत. तर दक्षिण गोव्यात कुडचडेत 540, वास्कोत 715, कांसावलीत 876, कुठ्ठाळीत 846, फोंड्यात 1032, कुडतरी 592, तर मडगावात सर्वाधिक 1829 रुग्ण गेल्या 24 तासांत सापडलेत.

काळजी घ्या, सुरक्षित रहा

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली जातेय. रोज कोरोनाची वाढती प्रकरण आणि कोरोनामुळे वाढणारी मृतांची संख्या ही चिंताजनक आहे. कोरोनाला जर पळवून लावायचं असेल, तर आपणच स्वतःची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मास्क वापरणं, सॅनिटायझर लावणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!