CORONA UPDATE | गुरुवारी 21 तर 4 दिवसांत 81 मृत्यूंची नोंद

मृत्यूदराची चिंता राज्यात कायम

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो: राज्यात गुरुवारी तब्बल 21 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता 960च्या पुढे गेलाय. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे तब्बल 964 रुग्ण दगावले आहेत. गेल्या काही दिवसांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर गेल्या 4 दिवसांत तब्बल 81 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू दिली आहे.

हेही वाचाः अरे देवा! गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट देशापेक्षाही जास्त

राज्याचा मृत्यूदर, चिंतेत भर

राज्याचा मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरू लागला आहे. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटही खालावला आहे. तसंच पॉझिटिव्हीटी रेटही भयंकर वाढलाय. देशापेक्षाही गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा चिंताजनक असून आता तो 37 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. 18 एप्रिलपासून मृतांची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात सलग दुसऱ्यांदा 20 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. गुरुवारी राज्यातील जीएमसीत 11, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 8 तर आझिलो, म्हापशात दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः ‘भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्याच’

22 एप्रिलला 21 रुग्णांचा मृत्यू

18 एप्रिललला 11, १९ एप्रिलला 17, 20 एप्रिलला 26 तर २१ एप्रिलला पुन्हा 17 जणांचा मृत्यू झाला होता. तर 22 एप्रिलला म्हणजे आज 21 रुग्ण दगावले आहेत. म्हणजेच गेल्या 4 दिवसांत तब्बल 81 रुग्ण दगावलेत. गुरुवारी मृत्यू झालेल्यांमध्ये 13 पुरुष आहेत, तर 8 महिला आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!