CORONA UPDATE | कोरोना रुग्णवाढ झाली कमी; मात्र सलग तिसऱ्या दिवशी 17 जणांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळुहळू कमी होताना दिसतेय. राज्याचा रिकव्हरी तसंच पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय, जी आनंदाची गोष्ट आहे. मात्र त्याचबरोबर कोविडमुळे होणारे मृत्यू अद्याप कमी झालेले नाहीत. त्यामुळे एका डोळ्यात हासू तर दुसऱ्या डोळ्यात आसू अशी सध्या राज्याची परिस्थिती आहे. दक्षिण गोव्यातील कोरोनाबाधितांची चढी असलेली संख्या हळुहळु खाली येतेय. त्यामुळे दक्षिण गोव्याला काही प्रमाणात दिलासा मिळालाय.
हेही वाचाः कोलवाळ पोलिस स्थानकाचा मार्ग मोकळा
शनिवारची कोरोनाची आकडेवारी काय सांगते?
राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार मागच्या दोन दिवसांची कोरोनाची आकडेवारी पाहिल्यात गुरुवारी राज्यात 572, तर शुक्रवारी 576 नवे कोरोनाबाधित सापडले. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण फार नाही, पण थोड्या प्रमाणात घटलंय. शनिवारी 567 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीये. यातील 465 जणांनी होम आयझोलेशन स्विकारलं असून 102 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. सध्या राज्यात 8 हजार 216 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

मागच्या 24 तासांत एवढे जण झाले कोरोनातून बरे
मागच्या 24 तासांच राज्यात 1433 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यातील 99 जण पूर्ण बरे होऊन त्यांना हॉस्पिटलमधून डिश्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या रिकव्हरी रेट ची नोंद 93.11 टक्के झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा दुप्पट आहे.
हेही वाचाः CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक
मागच्या 24 तासात एवढ्या चाचण्या
हळुहळू लोकांमध्ये जागृती निर्माण होत असल्याने कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. मागच्या 24 तासांत 4 हजार 131 जणांनी कोरोनाची चाचणी केली आहे. यातील 567 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा हा बराच कमी असल्याने त्या दृष्टीने थोडा दिलासा आहे.

मात्र तरीही चिंता
राज्याच्या रिकव्हरी रेट जरी वाढत असला, कोरोनाबाधितांची संख्या जरी कमी होत असली, तरी राज्याची चिंता अजूनही संपलेली नाही. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे सलग तीन दिवस तब्बल 17 जणांच्या कोरोना लढाईत हार झालीये. शनिवारी राज्यात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यातील गोमेकॉत 10, दक्षिण गोवा हॉस्पिटलात 6 तसंच मदर केअर हॉस्पिटलमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत कोविडमुळे तब्बल 2744 जणांचा मृत्यू झाला आहे.