मोठा दिलासा! नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण दुप्पट

199 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुप्पटपेक्षा जास्त नोंदवण्यात आली आहे. तब्बल ३,८९८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील एकूण १३५८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर तब्बल ३ हजार १२० रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही २३ हजार ९४६ वर पोहोचली आहे.

हेही वाचा – चिंताजनक! करोनामुळे एका दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यू

रिकव्हरी रेट ८१ टक्क्यांच्या पार

मे महिन्यात कोरोनामुळे झालेल्या मृतांचं प्रमाण हे लक्षणीय जरी असलं, तरी याच मे महिन्यात पुन्हा एकदा रिकव्हरी रेटमध्येही सुधार दिसून आल्यानं आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळालाय. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हे ८१.१६ टक्के इतका असून आतापर्यंत तब्बल १ लाख १२ हजार ६३३ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत.

corona update
corona update

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीननुसरा एकूण १ हजार १८० रुग्ण हे नव्यानं होम आसलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तर १८२ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, १९९ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

मृत्यूदराची चिंता कायम

मंगळवारी एकूण ४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता २२००च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मे महिन्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अजूनही राज्यातील कोरोना स्थिती ही नियंत्रणात आली नसल्याचं अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. दरम्यान उत्तरेतील कोविड केअर सेंटरमध्ये २३८ तर दक्षिणेत १३६ बेड्स एव्हेलेबल असल्याचंही समोर आलंय.

हेही वाचा – मोपा विमानतळामुळे शेतकरी देशोधडीला

कुठे किती मृत्यू?

जीएमसी २६ मृत्यू
द.गो.जिल्हा रुग्णालय ११ मृत्यू
द. गो. खासगी रुग्णालयात ३ मृत्यू
उत्तर गोवा खासगी रुग्णालयात २ मृत्यू
ऑस्पिसिओमध्ये १ मृत्यू
उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात १ मृत्यू
फोंडा उपजिल्हा रुग्णालयात १ मृत्यू

दरम्यान, मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या कोरोना बळींमध्ये सर्वाधिक मृत्यू हे जीएमसीत नोंदवण्यात आले असले, तरी महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यू झालेल्यांपैकी फक्त तिघांच रुग्णांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बळींचा आकडा हा केव्हाच २ हजाराच्या पार गेला असून तो आता २२००च्याही उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ही आता २ हजार १९७वर जाऊन पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकूण मृतांपैकी निम्मे मृत्यू हे मे महिन्यात नोंदवण्यात आल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा – जहाज बुडालं ! 146 जणांना वाचवलं, 130 बेपत्ता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!