कोरोना आकडेवारी | 26 मे | मृतांचा एकूण आकडा अडीच हजाराच्या उंबरठ्यावर

नव्या रुग्णांची संख्या घटली आणि बरे होणाऱ्यांचीही

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात बुधवारी नव्या १ हजार ४८७ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या २४ तासांत १ हजार ३६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. एकूण राज्यातील नव्या रुग्णांसह बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याचं बुधवारी पाहायला मिळालंय. दरम्यान, नव्या रुग्णांपैकी १ हजार ३२२ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर १६५ रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.

हेही वाचा : ओव्हरटेकिंगच्या नादात दुचाकीचा अपघात! जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरु

corona update

मृत्यूदर कमी होईना!

राज्यात बुधवारी ३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ही आता अडीच हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ही २ हजार ४९९ इतकी झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापासून सुरु वाढलेला मृत्यूदर काही केल्या आटोक्यात येताना दिसत नसल्याचं चित्र संपूर्ण मे महिन्यातही पाहायला मिळतंय.

Corona Body

हेही वाचा : अरे देवा! ज्याची भीती होती, तेच झालं

चाचण्याही कमी

सध्या राज्याचा रिकव्हरी रेट हा वाढलेला असून बुधवारी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा रिकव्हरी रेट हा ८७.८८ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील दर दिवशी होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी एकूण ४ हजार ६१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे राज्यातील कोविड केअर सेंटरमधील खाटाही रिकाम्या असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तरेत २२६ तर दक्षिणेत १७१ खाटा कोविड केअर सेंटरमध्ये रिकाम्या आहेत. तसंच १३४ रुग्णांना बुधवारी हॉस्पिटलमधूनही डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्याच्या घडीला राज्यात १५ हजार ७९१ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा : चिंताजनक! कोरोना बळींचा आकडा आटोक्यात येईना, पुन्हा 4,157 मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!