बुधवारी कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला आणि मृत्यूसंख्याही!

गेल्या २४ तासांत ६ रुग्ण कोरोनामुळे दगावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेल्या ७८ दिवसांतली कोविड बळींची संख्या दोनवर आल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं होतं. मात्र बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील कोरोना बळींचा आकडा वाढला आहे. गेल्या २४ तासांत ६ रुग्ण कोरोनामुळे दगावल्याचं आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ही ३ हजार ५४ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरीही अजूनही राज्यातील कोरोना बळींची चिंता ही कायमच आहे.

हेही वाचा : कर्नाटकात जाण्यासाठी टेस्ट किंवा पहिला डोस बंधनकारक

काय आहे बुधवारची आकडेवारी?

राज्यात बुधवारी आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, नव्या २५० रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांत नव्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचं प्रमाण जे जास्त दिसत होता, त्याला बुधवार अपवाद ठरलाय. बुधवारी नव्या रुग्णांची संख्या ही बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कमी आहे. २०१ रुग्णांना गेल्या २४ तासांत कोरोनावर मात केल्याचं पाहायला मिळालंय. राज्याचा रिकव्हरी रेट हा आता ९६.८० टक्क्यांवर गेल्याची नोंद बुधवारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : कलाकारांना मिळणार 5 ते 10 हजारपर्यंत साहाय्य

डिस्चार्जपेक्षा ऍडमिट झालेलेही जास्त

दरम्यान, बुधवारी १९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर २७ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे चिंताही व्यक्त केली जातेय. त्यामुळे डिस्चार्जपेक्षा रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही जास्तच असल्याचं अधोरेखित झालंय. नव्या रुग्णांपैकी २१३ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट सुधारतो आहे. तर सक्रिय रुग्णसंख्याही हळूहळू घटतेय. दरम्यान, सध्याच्या घडीला राज्यात एकूण २ हजार २७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बुधवारी दगावलेल्या ६ रुग्णांना धरुन एकूण मृत्यूसंख्याही ३ हजार ५४वर पोहोचली आहे.

हेही वाचा : नॅशनल डॉक्टर्स डे विशेष | फक्त ‘5’ रुपयांत उपचार करणारा डॉक्टर

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!