सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं समोर!

पण मृत्यूदराच्या चिंतेचं काय?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त केला जातो आहे. शनिवारी नव्या १ हजार ९५७ रुग्णांचं निदान झालंय. एकूण ५ हजार ५७१ चाचण्या करण्यात होत्या. त्यातील ३ हजार ६४१ चाचण्या या निगेटिव्ह आल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णवाढीचा वेग कमी झाला असून दुसरीकडे पॉझिटिव्हिटी रेट हा ३५. १३ टक्के नोंदवण्यात आला आहे.

हेही पाहा : राज्यातील कोरोनाची स्थिती दुर्दैवी आणि क्लेशकारक- लक्ष्मीकांत पार्सेकर

दरम्यान, उत्तर गोव्यातील स्थिती ही चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. सातत्यानं रुग्णवाढ होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये उत्तर गोव्याचाही समावेश करण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे. उत्तर गोव्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णवाढीची चिंता कायम असल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा ताणही आल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, आता वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर फक्त पत्रादेवीचा मार्गच खुला ठेवण्यात आला आहे. इतर सर्व चेकपोस्ट सील करण्यात आल्या असून गोव्यात प्रवेश करण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीही बंधनकारक करण्यात आली आहे. दुसरीकडे गोव्यातून महाराष्ट्रात जाण्यासाठीही आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

हेही वाचा – Positivity Rateमध्ये गोवा दुसऱ्या स्थानी! पण फरक फारसा नाही

मृत्यूदराचं काय?

दरम्यान, राज्यातील मृत्यूदराची चिंता कायम आहे. राज्यातील एकूण कोरोना बळींचा आकडा हा आता २ हजारच्या पार गेलाय. राज्यात शनिवारी ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या आता २ हजार ५६वर जाऊन पोहोचली आहे.

राज्यात १ हजार ७४५ रुग्ण नव्यानं होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर २४२ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली असून आता रिकव्हरी रेट हा ७५ टक्क्याच्याही पुढे गेलाय. राज्याचा रिकव्हरी रेट हा ७५.६० टक्के इतका नोंदवण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!