मे महिन्याचे पहिले 18 दिवस, 1,029 मृत्यू, 18 पैकी 14 दिवस तर 50 पेक्षा जास्त मृत्यू

बरे झालेल्या रुग्णांची संख्या नव्यांच्या तुलनेत २ हजारने कमी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : २०२१मधील मे महिना हा कोरोना आकडेवारीबाबतचा अत्यंत दु्र्दैवी महिना ठरताना दिसतो आहे. मे २०२१च्या पहिल्या १८ दिवसांमध्ये तब्बल १ हजार २९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरची डोकेदुखी वाढली आहे. ११ मे ती १४ मे दरम्यान, सर्वाधिक मृत्यूंचीही नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या एकूण मृतांच्या आकडेवारीतील ५० टक्के मृतांची संख्या ही एकट्या मे महिन्यात नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा – हसत हसत आत्महत्या करणाऱ्या आयशाची काळीज हेलावणारी गोष्ट

बरेही जास्त झाले, आणि मृत्यूही जास्तच झाले!

मे महिन्यातील मृतांची आकडेवारची जास्त आहे, असं नव्हे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. १५ मे पासून राज्यातील कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण खाली घसरत असल्याचं पाहायला मिळतंय. १५ मेपासून कोरोनाची राज्यातील रुग्णवाढ ही २ हजाराच्या आत आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या १८ दिवसांत तब्बल ४७ हजार ८०४ नव्या रुग्णांची भर राज्यात पडली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, बहुसंख्य रुग्ण हे बरेही झाल्याचं समोर आलं आहे. १ मे ते १८ मे दरम्यान एकूण ४५ हजारपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. १५ मे पासून एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे १५ मे पासूनच नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही जास्त नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा – हा Video पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

18 दिवसांचा आलेख काय सांगतो?

दरम्यान, १ मे पासून ते १८ मे मधील १४ दिवस असेल होते, ज्यावेळी ५० पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूण आकडेवारी पाहिली तर एकट्या मे महिन्यात १ हजार २९ रुग्ण दगावले आहेत, आतापर्यंत २ हजार १९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ४५ हजार४२१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४७ हजार ८०४ रुग्ण हे बरे झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्या हा अत्यंत चिंताजनक आकडेवारी घेऊन सुरु झाला होता. मात्र मे महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याच रिकव्हरी रेटवरुन दिसून येतंय. मात्र अजूनही मृत्यदर कमी होत नसल्याचं चिंता कायम आहे.

हेही वाचा – फोंड्यात रवी‌ विरोधकांचा विजय, रितेश नाईकांचा पराभव

नेमकी आकडेवारी काय आहे?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!